Mohanlal
Mohanlal  Esakal
मनोरंजन

Ivory case : अभिनेते मोहनलाल यांच्या अडचणीत वाढ! केरळ उच्च न्यायालयाने 'या' प्रकरणी फेटाळली याचिका

सकाळ डिजिटल टीम

केरळ उच्च न्यायालयाने काल (बुधवारी) दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांची याचिका फेटाळली आहे. हस्तिदंताच्या बेकायदेशीर ताब्याशी संबंधित प्रकरणात त्याच्याविरुद्धचा खटला मागे घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला रद्द करण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरुद्धची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने राज्याच्या याचिकेला अंशत: परवानगी दिली आणि दंडाधिकारी न्यायालयाला थोडा दिलासा देण्यासाठी त्यावर नव्याने विचार करण्यासाठी सांगितले आहे.

हा खटला मागे घेण्यासाठी राज्य सरकारच्या याचिकेवर नव्याने विचार करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, "सध्याचा खटला मागे घेण्याच्या मागणीवर ट्रायल कोर्टाने फेरविचार करणे आवश्यक आहे. तसेच, पक्षकारांना 3 मार्च रोजी ट्रायल कोर्टात हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत".

2012 साली आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यामध्ये दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांच्या घरातून चार हस्तिदंत जप्त करण्यात आले होते, त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तक्रारदाराने असा आरोप केला होता की, अभिनेत्याने पुढील तपास न करता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

48 पानांच्या निकालात न्यायालयाने म्हटले की, "कायदा सर्वांसाठी एकसमान असला पाहिजे, त्यांची स्थिती शेतकरी, गरीब, मध्यमवर्गीय किंवा उच्च वर्ग म्हणून असली तरीही".

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT