Pravin Tarde 
मनोरंजन

'पांडू'मध्ये दिसणार प्रविण तरडेंचा करारी बाणा

'जाणता राजा' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

स्वाती वेमूल

आजवर विविध प्रकारच्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या प्रविण तरडेंचा आगळा वेगळा करारी बाणा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. आगामी ‘पांडू’ या चित्रपटात ते एका शिवप्रेमी, भारदस्त राजकीय व्यक्तीचं पात्र साकारत आहेत. या चित्रपटातील ‘जाणता राजा’ हे छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणारं गाणं नुकतंच प्रदर्शित झालंय. या गाण्यामधून प्रविण तरडेंचा हा वेगळा लूक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या आणि विजू माने यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘पांडू’ चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. या टिझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांच्यासोबत या चित्रपटात कोणते कलाकार असतील याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली होती. प्रेक्षकांची ही उत्सुकता आणि उत्कंठा आता आणखीनच वाढणार आहे, कारण यात अभिनेता प्रविण तरडे एका आगळ्या वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर आणि प्रेम असणाऱ्या एका करारी बाण्याच्या राजकीय नेत्याची भूमिका ते यात साकारत आहेत. याशिवाय सुप्रसिद्ध लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीही यात एका विशेष भूमिकेत दिसणार आहे.

‘पांडू’ चित्रपटातील या भूमिकेसाठी प्रविण तरडेंचा एक खास लूक तयार करण्यात आलाय. याबद्दल प्रविण तरडे म्हणतात की, “या भूमिकेबद्दल मी कमालीचा उत्सुक आहे. हा लूक प्रेक्षकांसमोर कधी येतो याची मी स्वतः गेल्या अनेक दिवसांपासून वाट बघत होतो. झी स्टुडिओजने माझ्या वाढदिवशी हे गाणं आणि माझा हा लूक प्रेक्षकांसमोर आणायचं ठरवलं याहून आनंदाची दुसरी गोष्ट नाही. हे गाणं, हा लूक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे.”

महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगणाऱ्या ‘जाणता राजा’ या गाण्याचे गीतकार समीर सामंत आहेत. तर महाराष्ट्राचा लोकप्रिय संगीतकार अवधूत गुप्ते यांनी ते संगीतबद्ध केलंय. आजवर आपल्या धारदार आवाजाने रसिकांची मने जिंकणाऱ्या आदर्श शिंदेने हे गाणं त्याच जोशात आणि ढंगात गायलं आहे. ‘पांडू’ हा चित्रपट येत्या 3 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Dhas: ''माझा मुलगा सुपारीसुद्धा खात नाही'', 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'च्या आरोपावर सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

एक नायक तर दुसरी खलनायिका; टीव्हीचे गाजलेले चेहरे पुन्हा भेटीला येणार; कोण आहेत ते? प्रेक्षकांनी सांगितली नावं

Jalgaon News : खेळता खेळता हरवला जीव! जळगावात १३ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Electricity Supply: अदानी हटाव..., प्रीपेड मीटरला ग्राहकांचा नकार; महावितरण खाजगीकरणाविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

Pune Market Committee : संचालक मंडळ बरखास्त करून ईडी व इन्कम टॅक्स चौकशी करा; राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष विकास लवांडे यांची मागणी

SCROLL FOR NEXT