Kareena Kapoor OTT Debut: Kareena Kapoor, Jaideep Ahlawat, Vijay Varma's first looks out Esakal
मनोरंजन

Jaane Jaan Trailer: 'झुरळाला नाही तर अख्या माणसालाच मारलं!' करिना अन् विजयच्या 'जाने जा' चा खतरनाक ट्रेलर रिलिज

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही गेल्या काही दिवसांपासून चित्रपटातुन लांब होती. तिचा लाल सिंग चढ्ठा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करु शकला नाही. आता करिना ओटीटीच्या दुनियेत पदार्पण करणार आहे. काही दिवसांपुर्वी तिच्या 'जाने जान' या चित्रपटाचा टिझर रिलिज करण्यात आला होता. त्यानंतर प्रेक्षकांना या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सूकता लागली होती.

आता निर्मात्यांनी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटील आणला आहे. आज म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी करिनाचा बहुप्रतिक्षित थ्रिलर चित्रपट 'जाने जान'चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

सुजॉय घोष यांनी चित्रपट 'जाने जान'चे दिग्दर्शन केले आहे. करिनासोबत या चित्रपटात जयदीप अहलावत आणि विजय वर्मा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

रिलीज झालेल्या ट्रेलरनुसार करिना 'माया'च्या भूमिकेत दिसली तर जयदीप अहलावत 'नरेन'ची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात विजय वर्माच्या भिमिकेने प्रेक्षकांची मनं जिकंली आहे. तो यात 'करण'नावच्या पोलिसाची भूमिका साकारतांना दिसत आहे.

चित्रपटाचा ट्रेलर करीना कपूरपासून होते जी जयदीप अहलावतच्या शेजाऱ्याची भूमिका करते. जयदीप हा चित्रपटात कराटे ट्रेनर ची भुमिका करतोय. जयदीपला जेव्हा करीनाच्या घरातून काही आवाज ऐकू येतात तेव्हा तो तिला विचारायला येतो. त्यावेळी सर्व काही ठीक आहे विचारल्यावर करीना त्यांना घरात झुरळ होते आणि त्याला मारतांना तो आवाज झाला असं सांगतेल तर दुसरीकडे विजय वर्मा हा बेपत्ता असलेल्या एका पोलिसाला शोधत आहे . त्याला करीनावर संशय असतो.

चित्रपटाच्या ट्रेलर लाँचबद्दल बोलताना, दिग्दर्शक आणि लेखक सुजॉय घोष म्हणाले की , “माझ्या आवडत्या ‘जाने जान’ या चित्रपटाची झलक प्रेक्षकांना पाहायली. कालिम्पॉन्गमध्ये असेलेल्या प्रेम संस्पेंस आणि ड्रामा सगळचं पहायला मिळणार आहे. या चित्रपटात करीना, जयदीप आणि विजय यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. हा चित्रपट 21 सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: Out or not Out? लॉर्ड्सवर भारताच्या अपीलवर इंग्लंडच्या फलंदाजाला नाबाद देणं ठरलं वादग्रस्त; काय आहेत नियम?

Agricultural News : कांदा खरेदीत पारदर्शकता येणार! लासलगाव येथे दक्षता समिती स्थापन; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

बापरे! झी मराठीवरील 'पारु' मालिका निरोप घेणार? 'या' कारणामुळे रंगली चर्चा

Bachchu Kadu: 'कृषिमंत्री रमीमध्ये गुंग;शेतकऱ्यांचं भलं कसं होईल?'

Gold Rate: सोनं घ्यायचंय? पुढच्या आठवड्यात दर वाढतील की कमी होतील? गुंतवणुकीपूर्वी 'ही' बातमी नक्की वाचा!

SCROLL FOR NEXT