Jackie Shroff reacts to Tiger Shroff-Disha Patani breakup Google
मनोरंजन

Tiger-Disha Breakup:जॅकी श्रॉफची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले,'मला वाटतं...'

दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ यांनी आपल्या सहा वर्षांच्या नात्याचा द एन्ड केल्याची बातमी जोरदार व्हायरल होत आहे.

प्रणाली मोरे

(Bollywood)बॉलीवूडचं नेहमीच चर्चेत असलेलं कपल,महत्वाचं म्हणजे अगदी एक दूजे के लिए कॅटॅगरीत सामिल असलेलं कपल जेव्हा ब्रेकअप करतायत असं कळलं तेव्हा चाहत्यांच्या मनात धस्स तर होणारच नाही का. दिशा पटानी(Disha Patani)आणि टायगर श्रॉफ(Tiger Shroff) यांनी आपल्या सहा वर्षांच्या नात्याचा द एन्ड करायची बातमी काल रात्रीपासून सगळ्यांच्या विचारात घूमत असणार हे नक्की. काय झालं दोघांत की एवढं तडकाफडकी निर्णय ठरला हे जाणून देखील घ्यायचं असणार. बोललं जात आहे की गेल्या वर्षभरापासून त्यांच्या नात्यात दुरावा येत चालला होता, फायनली मग दोघांनी संगनमताने ठरवून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता यावर टायगर श्रॉफचे वडील अभिनेते जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. काय म्हणाले आहेत बरं ते? चला,जाणून घेऊया.(Jackie Shroff reacts to Tiger Shroff-Disha Patani breakup)

एका इंग्रजी वृत्तपत्राला चल भिडू म्हणत आपल्या चाहत्यांना आपलंसं करणाऱ्या जॅकी श्रॉफ यांनी मुलाच्या ब्रेकअप संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. जॅकी श्रॉफ नेहमीच दिशा पटानी आपल्या कुटुंबाचा भाग असल्यासारखेच तिच्याविषयी बोलायचे. ते म्हणाले आहेत, टायगर आणि दिशा खूप चांगले मित्र होते,आणि आजही त्यांच्यातील मैत्री कायम आहे. मी त्यांना नेहमी एकत्र फिरायला जाताना पाहिलं आहे. पण मी माझ्या मुलाच्या लव्हलाइफ वर नजर ठेवून कधीच राहिलो नाही. मी मुलांच्या पर्सनल लाइफमध्ये ढवळाढवळ करत नाही. मी ते केलं तरी ते कदाचित शेवटचं असेल. पण मला वाटतं दिशा आणि टायगर खूप घट्ट मित्र आहेत. ते कामाव्यतिरिक्त एकमेकांसोबत वेळ घालवतात.

यासंदर्भात पुढे सांगताना जॅकी श्रॉफ म्हणाले, ते त्यांचे आयुष्य आहे,खाजगी...,त्यांनी ठरवायचं ते आयुष्य कसं जगायचं. हे संपूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे, हे एकत्र राहू शकतात की नाही, ते एकमेकांसाठी परफेक्ट आहेत की नाही. ही त्यांची प्रेमकहाणी आहे. अगदी माझी आणि माझ्या बायकोची जशी लव्हस्टोरी आहे अगदी तशी. आमचं सगळ्यांचे दिशासोबत खूप चांगलं नातं आहे. आणि मला वाटतं ते जेव्हा एकत्र असतात ते खूप खूश असतात,खूप गोष्टी ते शेअर करतात.

दिशा आणि टायगर हे वैयक्तिक आयुष्यात जरी कपल असले तरी व्यावसायिक आयुष्यात ते एकमेकांचे सहकलाकारही राहिले आहेत. बाघी२, बाघी ३, म्युझिक व्हिडीओ, बेफिक्र अशा अनेक सिनेमांची नावे घेता येतील. दिशाने राधे सिनेमात जॅकी श्रॉफसोबत काम केले आहे.

दिशाचे टायगरची बहिण कृष्णा श्रॉफ सोबत देखील खूप छान बॉन्डिंग आहे. सोशल मीडियावर अनेकदा दोघींनी एकत्र असे धमाल व्हिडीओ शेअर केले आहेत. कृष्णानं एका मुलाखती दिशाविषयी बोलताना सांगितलं होतं की,दोन मुलींमध्ये एकमेकींविषयी इतकी आपुलकी,सम्मान खूप कमी पहायला मिळतो,पण तो माझ्या आणि दिशाच्या नात्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Election 2025 : अखेर मनपा निवडणुका जाहीर, मतदान अन् निकालाची तारीख काय? कसा असेल निवडणूक कार्यक्रम? वाचा....

BMC Election: सत्ता, संघर्ष आणि संधी... बीएमसीच्या गेल्या ५ निवडणुकांचे निकाल काय होते? जाणून घ्या मुंबई महापालिकेचा राजकीय प्रवास...

Latest Marathi News Live Update : चाळीसगाव तालुक्यात ९ वर्षीय चिमुकली अचानक बेपत्ता; अपहरणाचा संशय

Delhi-Mumbai Expressway Accident : दिल्ली-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर भयानक अपघात ; २५ वाहनं एकमेकांना धडकली, चौघांचा मृत्यू

IPL 2026 Auction : उद्या लिलाव अन् पठ्ठ्याने आज ठोकले खणखणीत शतक... कुटल्या १५ चेंडूंत ७२ धावा; RCB च्या माजी खेळाडूची धमाल

SCROLL FOR NEXT