Jackie Shroff Google
मनोरंजन

जॅकी दादाने का केली मरण्याची गोष्ट?

अभिनेत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये तो म्हणतोय की...

प्रणाली मोरे

अभिनेता जॅकी श्रॉफ(Jackie Shroff) म्हणजे सगळयांचा लाडका जग्गू दादा. त्यांची 'बिडू' भाषा सर्वांच्याच मनाला भिडते. मग अगदी त्याच्यासमोर स्टायलिश बॉलीवूडकर असोत की सर्वसामान्य प्रेक्षकवर्ग. पण आज असं काय झालंय आपल्या जग्गू दादाच्या आयुष्यात की तो जन्म-मृत्यूवर बोलायला लागलाय. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय त्यात त्यानं स्वतःच्या मरणावरही थेट भाष्य केलंय. आता त्याचं हे भाष्य ऐकून चाहता वर्ग मात्र नाराज झालाय,थोडासा दुखावलाय. आपला लाडका प्रेमळ नट जर असं काही बाही बोलला तर वाईट वाटणारंच न.

त्या व्हिडीओत जॅकी श्रॉफ म्हणाले आहेत,''सगळ्यांना एक दिवस हे शरीर सोडून जायचंय मरणाच्या वाटेनं. माझी आई गेली,माझे वडील गेले,माझा भाऊ गेला. एक दिवस मी ही जाईन. पण जेव्हा लोक जातात तेव्हा तुमच्या आयुष्यात नवीन लोक येतातही. माझ्या आयुष्यात माझी बायको आली,टायगर आला,कृष्णा आली. उद्या मी गेल्यावरही कुणीतरी नवीन ती जागा घेणारंच. हे निसर्गाचं चक्र असंच सुरू राहणार. आपण फक्त जगत रहायचं''. याचवेळेस त्यांनी लोकांनाही जीवन कसं जगा याविषयावरही चांगलं सांगितलं आहे.

ते लोकांना उद्देशून म्हणालेयत,''तुम्ही आपलं दुःख उगाळत बसू नका. तुमच्या आजुबाजूचं दुःख पाहिलंत की तुम्हाला तुमचं दुःख काहीच नाही वाटणार. आयुष्य छोटं आहे,त्यामुळे देवानं जे आयुष्य दिलंय ते आनंदात जगा. लोकांना आनंदात जगु द्या. आपल्याकडे जे आहे त्यात आनंद माना''. जॅकी दादानं ही मात्र लाख पते की बात सांगितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT