Jacqueline Fernandez Latest News Jacqueline Fernandez Latest News
मनोरंजन

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला नवे समन्स; १४ सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसविरोधात नवे समन्स जारी केले आहे

सकाळ डिजिटल टीम

Jacqueline Fernandez Latest News मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) दिल्ली पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसविरोधात (Jacqueline Fernandez) नवे समन्स जारी केले आहे. जारी करण्यात आलेल्या समन्सनुसार, अभिनेत्रीला आता १४ सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणात यापूर्वी जारी केलेल्या समन्सनुसार अभिनेत्रीला १२ सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले होते. परंतु, काही पूर्वनियोजित वचनबद्धतेमुळे अभिनेत्रीने नियोजित तारखेला उपस्थित राहण्यास असमर्थता व्यक्त करीत पोलिसांकडे दुसरी तारीख मागितली होती.

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची (Jacqueline Fernandez) सोमवारी होणारी चौकशी पुढे ढकलली होती. तसेच या संदर्भात जॅकलिनला आणखी समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती दिली होती. अभिनेत्रीने दिल्ली पोलिसांना ईमेलद्वारे कळवले होते की आधीच केलेल्या काही वचनबद्धतेमुळे १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या तपासात उपस्थित राहू शकणार नाही. त्यानंतर तिने नवीन तारखेची मागणीही केली होती.

महाठग सुकेश चंद्रशेखरच्या कथित २०० कोटींच्या खंडणी प्रकरणात तपासात सामील होण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जॅकलिनला समन्स बजावले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) (ED) चार्जशीटमध्ये जॅकलिनचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणाशी (Money Laundering Case) जोडले होते. जॅकलिनला सुकेशचा गुन्हेगारी खटल्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती होती, असेही ईडीच्या आरोपपत्रात म्हटले आहे. त्यानंतरही तिने सुकेशच्या गुन्हेगारी नोंदीकडे दुर्लक्ष करून आर्थिक व्यवहार केले.

मनी लाँड्रिंग प्रकरणात नाव समोर आल्यापासून अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस अनेकवेळा ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाली आहे. या प्रकरणी अभिनेत्रीची ३० ऑगस्ट आणि २० ऑक्टोबर २०२१ रोजी चौकशीही करण्यात आली होती. यादरम्यान अभिनेत्रीने चंद्रशेखरकडून अनेक महागड्या भेटवस्तू घेतल्याचे कबूल केले होते. सुकेश चंद्रशेखर हा मूळचा बेंगळुरू, कर्नाटकचा रहिवासी आहे. तो सध्या दिल्लीच्या तुरुंगात असून, त्याच्यावर १० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT