Jacqueline Fernandez Received Calls,Texts From Conman Sukesh Chandrashekhar while he was in Tihar Jail? Here's what we know  Google
मनोरंजन

Jacqueline ला सुकेश चंद्रशेखर तिहार जेलमधून करायचा फोन, मोठा खुलासा

कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये जॅकलिनचे नावही समोर आले आणि तिच्यामागेही ईडीचा ससेमिरा लागला होता.

प्रणाली मोरे

जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)मागील काही महिन्यांपासून भलतीच चर्चेत आहे. कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर (Conman Sukesh Chandrashekhar) सोबतच्या तिच्या प्रेम प्रकरणामुळे तर जरा जास्तच तिच्याभोवती प्रसिद्धिचं वलय आहे. ईडीने सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग केस(Money Laundering Case) प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसची चौकशी केली होती. पण खूप कमी जणांना माहित आहे की या दोघांच्या प्रेम कहाणीची सुरुवात नेमकी झाली कशी? ईडी समोर हजेरी लावण्यापासून अनेकदा आतापर्यंत जॅकलिनच्या नावे समन्स जारी करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त कितीतरी वेळा सुकेशसोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले गेले आहेत. पण आता जो रिपोर्ट्स समोर आला आहे,त्यात बोललं जात आहे की जॅकलीन आणि सुकेशच्या प्रेम कहाणीची सुरुवात २०२१ मध्ये तिहार जेलमधून मेसेज करण्यापासून सुरू झाली.(Jacqueline Fernandez Received Calls,Texts From Conman Sukesh Chandrashekhar while he was in Tihar Jail? Here's what we know)

एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार,जॅकलिनने सुरुवातीला सुकेशला काहीच उत्तर दिलं नाही,पण नंतर आपल्या हेअरड्रेसरच्या माध्यामतून तिनं त्याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरने एका टी.व्ही नेटवर्कचा मालक आणि बिझनेसमनच्या रुपात तिच्यासमोर स्वतःची ओळख ठेवली. सुकेशने तेव्हा असा देखील दावा केला होता की गृहमंत्री अमित शहांच्या तो खूप जवळचा आहे. जॅकलीनने ईडीला सांगितलं होतं की, सुकेश आपल्याला मेसेज करायचा तेव्हा तिहार जेलमध्ये होता याविषयी काहीच कल्पना नव्हती.

ईडीच्या सूत्रानं दावा केला आहे की ,सुकेश पेरोलवर बाहेर आल्यानंतर जॅकलीनला दोन वेळा भेटला होता. यापैकी एकदा जॅकलीन सुकेशला चेन्नईत भेटली होती. जेव्हा-जेव्हा जॅकलीन सुकेशला भेटण्यासाठी बोलवायची तेव्हा तो कोव्हिड नियमांचे कारण द्यायचा. त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट आली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांना जॅकलीनने इतकं देखील सांगितलं होतं की,तिनं सुकेशविषयी वर्तमानपत्रात वाचलं. तिला सांगितलं गेलं होतं की,सुकेशला खोट्या केसमध्ये अडकवलं गेलं आहे.

जॅकलिनच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर ती साऊथ सुपरस्टार किच्चा सुदीपच्या 'विक्रांत रोना' सिनेमात दिसणार आहे. २८ जुलै रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त ती 'टेल इट लाइक अ वुमन' या सिनेमातून हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. रणवीर सिंग सोबत 'सर्कस', अक्षय कुमारच्या 'राम सेतू' मध्ये तर सलमानच्या 'किक २' सिनेमातही मुख्य भूमिका साकारताना दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत आजही पावसाचा इशारा

Satara Child Marriage: कुमारवयातच वाढतेय संसाराचे ओझे; प्रेमाच्या आड ‘छुप्या बालविवाहा’चे सातारा जिल्ह्यात वाढताहेत प्रकार, संकटाची चाहूल!

फसवून लाटलेली जागा-जमीन मिळते परत! ३ वर्षांच्या आत द्यावी लागते तक्रार; फसलेल्याने वकिलांमार्फत ‘येथे’ करावा अर्ज, ‘या’ ६ बाबी लक्षात ठेवाच...

Phaltan Crime: फलटणमध्‍ये हल्ल्यांचे सत्र सुरूच; दोन व्‍यावसायिकांपाठोपाठ दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनाही जबर मारहाण, काय कारण?

आजचे राशिभविष्य - 25 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT