Jacqueline Fernandez signs biopic, inside details Google
मनोरंजन

7०च्या दशकातील अभिनेत्रीच्या बायोपीकमध्ये जॅकलिन,निघृण हत्येनं झालेला अंत

या सिनेमाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रदिप सरकार करणार आहेत.

प्रणाली मोरे

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)आता लवकर एका बायोपीक(Biopic) मध्ये दिसणार आहे. ७० आणि ८० च्या दशकातील प्रिया राजवंश यांची व्यक्तिरेखा साकारताना जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहे. या बायोपीक संदर्भात खूप दिवसांपासून चर्चा सुरु होती. या बायोपीक विषयी मिळालेल्या माहितीनुसार,अभिनेत्री प्रिया राजवंश यांच्यावर बायोपीक होणार हा निर्णय पक्का झाला आहे. सिनेमाच्या शूटिंगची तयारी देखील सुरु आहे. सिनेमात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस प्रिया राजवंश यांची व्यक्तीरेखा साकारणार असल्याचं देखील ठरलं आहे. जॅकलिन व्यतिरिक्त या सिनेमात विवेक ओबेरॉय(Vivek Oberoi) दिसण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. सिनेमाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रदिप सरकार करणार आहेत. प्रदिप सरकार यांनी 'लागा चुनरी में दाग' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये दिग्दर्शकीय पदार्पण केलं होतं. (Jacqueline Fernandez signs biopic, inside details)

या सिनेमात अभिनेता-दिग्दर्शक चेतन आनंद यांच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचा तपास सुरु आहे. विवेक ओबेरॉयला यासाठी विचारणा झाली आहे. जर सर्व बोलणी यशस्वीरित्या पार पडली तर विवेक ओबेरॉय चेतन आनंद यांच्या भूमिकेत दिसू शकेल. सिनेमाचं शूटिंग पुढील महिन्यात सुरु होणार असल्याच्या बातम्या आहेत. प्रिया राजवंश यांच्यावर असलेली ही बायोपीक सुबोध लाल यांच्या 'प्रिया अनइंटरप्टेड' पुस्तकावर आधारित आहे. सिनेमात प्रिया राजवंश आणि चेतन आनंद यांच्या रिलेशनशीपवर भाष्य करतानाच त्यांच्या फिल्मी करिअरवर देखील भाष्य करण्यात आलं आहे. अभिनेत्री प्रियाने हिंदीत केवळ सात सिनेमांतून काम केलं होतं. आणि त्या सर्व सिनेमांचे दिग्दर्शन चेतन आनंदने केले होते.

१९९७ मध्ये चेतन आनंद यांचा मृत्यू झाला. त्यांनी आपल्या संपत्तीचा एक हिस्सा प्रिया राजवंश यांच्या नावावर केला होता. बस्स,यावर नाराज होत त्यांच्या पहिल्या लग्नापासून असलेल्या दोन मुलांनी घरातील दोन नोकरांसोबत मिळून प्रिया राजवंश यांची २००० साली जुहू स्थित चेतन आनंद यांच्या बंगल्यात हत्या केली होती. हे सगळं कसं झालं हे अजूनही एक रहस्यच आहे.

प्रिया राजवंश यांच्या बायोपीकसाठी पुस्तकाचे राइटस् खरेदी केले गेले आहेत. निर्मात्याचं म्हणणं आहे की,प्रिया राजवंश यांच्या आयुष्यात कोणत्याही रोमांचक कथेत असतात तसे मिस्ट्री,थ्रिल आणि सस्पेन्स आहे. ही खुप वेगळ्या धाटणीची कथा आहे,ज्यामध्ये एक बॉलीवूड दिग्दर्शक एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिच्यासोबत सिनेमे बनवतो. मुलगी पण फक्त त्याच दिग्दर्शकासोबत काम करते. खऱ्याअर्थाने ही एक लव्हस्टोरी आहे. ज्यामध्ये रोमान्स तर आहेच पण रोमांचक वळणं आणि हत्या अशा थ्रिलिंग,सस्पेन्सशी जोडल्या जाणाऱ्या गोष्टी देखील दिसणार आहेत. प्रिया राजवंश यांचा 'हीर रांझा' आणि नवीन निश्चलसोबतचा 'हंसते जख्म' हे दोन सिनेमे हीट ठरले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flood Alert Kolhapur : कोल्हापुरात पाऊस थांबला तरीही पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, आलमट्टीतून विसर्ग वाढला

CIBIL Score: तुमचा CIBIL आताच सुधारा, जर तुमचा सिबिल खराब असेल तर नोकरीही मिळणार नाही

Viral video : धावत्या एसटी बसमध्ये मद्यधुंद कंडक्टरचा राडा, ड्रायव्हरने बस थांबवली अन्... व्हिडिओ व्हायरल

Rain-Maharashtra Latest Live News Update: गेल्या २४ तासांत घाट क्षेत्र आणि उत्तर कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद

Sickle Cell Patients in Crisis: सिकलसेल रुग्ण संकटात; डागा रुग्णालयात हायड्रॉक्सीयुरियाचा तुटवडा, उपचाराऐवजी रुग्णांना दाराबाहेर

SCROLL FOR NEXT