जॅकलीन फर्नांडिझ  टीम सकाळ
मनोरंजन

'हॅलो अमित शहांच्या ऑफिसमधून बोलतोय'! असं ऐकताच जॅकलीननं...

बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझ ही आता एका वेगळ्या प्रकरणात चर्चेत आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझ ही आता एका वेगळ्या प्रकरणात चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिला मनी माफिया सुकेश चंद्रशेखरनं गंडा घातलायाचे दिसून आले आहे. थोड्या वेळापूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही (Jacqueline Fernandez and nora fatehi) आणि सुकेश चंद्रशेखरचं (sukesh chandrashekhar) व्हाट्स अप चॅट व्हायरल झालं होतं. त्यामध्ये त्यानं नोराला लँड रोव्हर देण्याबाबत विचारलं होतं. त्यावर नोरानं देखील त्याला पसंती दर्शवली होती. आता जॅकलीन वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. काही दिवसांपासून बॉलीवूडच्या अभिनेत्री आणि सुकेश चंद्रशेखर यांचे कनेक्शन समोर आले आहे. त्यामध्ये त्यानं त्यांना लाखो रुपयांच्या वस्तूही दिल्याची बाब व्हायरल झाली आहे.

सध्या जॅकलीनची एक बातमी व्हायरल झाली आहे. त्यामध्ये तिला चक्क केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयातून एक निनावी फोन आला. त्यातून जॅकलीनला फसवण्यात आल्याचे दिसून आले आहे. हा फोन सुकेश चंद्रशेखरनं केल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे 2020 पासून श्रीलंकन अभिनेत्री जॅकलीनला अशाप्रकारे फोन केला जात आहे. आणि तिला अमिष दाखवून फसवण्याचा प्रकार होत असल्याचे तपासून समोर आले आहे. याशिवाय तिला त्यांच्या नावावरून धमकीही दिली जात आहे. यावेळी शेखर वेनावल्ला बनून जॅकलीनची भेट घेतली होती. ज्यावेळी सुकेशनं जॅकलीनला फोन केला तेव्हा त्यानं आपण एका बड्या राजकीय पार्टीशी संबंधित असल्याचे सांगितले होते. काही करुन जॅकलीनला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रकार या व्यक्तीनं केला होता.

इंडिया टूडेनं दिलेल्या माहितीनुसार, सुकेश हा गेल्या काही दिवसांपासून जॅकलीनवर पाळत ठेवून होता. त्यानं अनेकदा तिचा मेकअप मॅनच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न देखील केला. आपल्याशी मैत्री करावी यासाठी त्यानं जॅकलीनवर दबावही आणण्यास सुरुवात केली होती. सध्या सुकेश हा ईडीच्या ताब्यात आहे. त्यानं यंत्रणेला दिलेल्या माहितीनुसार, कॉल स्पूफ करुन जॅकलीनशी संपर्क साधला होता. ज्यावेळी जॅकलीनकडे चौकशी करण्यात आली तेव्हा तिनं सुकेशनं आपली ओळख ही शेखर रत्न वेला अशी करुन दिली होती. असं सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT