Pushpa 2  Esakal
मनोरंजन

Pushpa 2 : आरारा खतरनाक! अल्लू अर्जूनच्या पुष्पामध्ये 'या' सुपर साउथ व्हिलनची एन्ट्री... आता राडा होणार

Vaishali Patil

Pushpa 2 Movie News: अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची सध्या मनोरजंन विश्वात भलतिच चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर समोर रिलिज करण्यात आला आहे. हा टिझर रिलिज होताच त्याने सोशल मिडियावर खळबळ उडवून दिली होती.

अल्पावधीतच याच्या टीझरला भरपूर लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र या चित्रपटातील अल्लू अर्जूनच्या नव्या पोस्टरनं सर्वांच लक्ष वेधलं. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन भरजरी साडी नेसलेली दिसत आहे. कानात झुमके, हातात बांगड्या अन् गळ्यात ज्वेलरी आणि गळ्यात लिंबाची माळ घातली आहे.

अशा अल्लू अर्जुनच्या लूकनं त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. यानंतर सर्वजण या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसचं प्रेक्षकांना या चित्रपटासंबधित अपडेट जाणुन घेण्याची उत्सूकताही तितकीच आहे.

त्याचबरोबर आता या चित्रपटात एका नव्या खलनायकाची एन्ट्री झाली आहे. अशी बातमी समोर आली आहे. अल्लू अर्जुन म्हणजेच ​​पुष्पाला यावेळी एक नव्हे तर दोन खलनायकांचा सामना करावा लागणार आहे. तो दोन व्हिलनला भिडणार आहे.

आता या चित्रपटात साऊथ स्टार जगपती बाबूची खलनायक म्हणून एन्ट्री झाली आहे. खुद्द अभिनेत्यानेच याबद्दल माहिती दिली आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जगपती बाबूने स्वत: या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान याची पुष्टी केली.

या विषयी बोलतांना जगपती बाबू म्हणाले, सुकुमारसोबत काम करणं नेहमीच रोमांचक असतं कारण पुढे काय होणार आहे हे तुम्हाला कधीच माहीत नसतं. पुष्पा २ हे आव्हान आहे आणि मला आव्हाने आवडतात. सुकुमारने मला नेहमीच उत्तम पात्रे दिली आहेत. मला त्याच्यासोबत कधीही काम करायला आवडतं.

पुष्पाविषयी सांगायचे तर मला चित्रपटाचा पहिला भाग खूप आवडला. जगपती बाबूने असेही सांगितले की अल्लू अर्जुनला 20 वर्षांपूर्वी एका जिममध्ये पाहिल्यापासून तो नेहमी त्याच्याकडे लक्ष देतो. तेव्हा ते त्याला ओळखत नव्हते पण आता तो सुपरस्टार आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप अधिकृत मिळालेली नसली तरी, मात्र हे असेल तर तेलुगू चित्रपटसृष्टीतील हा एक नवा विक्रम ठरेल. अल्लू अर्जुनसोबत या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, फहद फासिल हे देखील दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT