Jai Bhavani Jai Shivaji 
मनोरंजन

'जय भवानी..'मधील अजिंक्य देव यांचा प्रवास संपणार; भूषण प्रधान भावूक

मालिकेत पाहायला मिळणार पावनखिंड लढाई

स्वाती वेमूल

बाजीप्रभू देशपांडे यांचा गनिमांसोबतचा पावनखिंडीतला झंझावात हे इतिहासातलं महत्वाचं पान. शिवरायांना विशाळगडावर सुखरुप पोहोचवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी जीवाची बाजी लावत सिद्दी मसूदच्या सैन्याला पावनखिंडीमध्येच रोखून धरलं. शिवरायांवरील निष्ठेपायी आणि स्वराज्य स्थापनेसाठी अफाट गनिमांसमोर बाजीप्रभू वाघासारखे लढले. बाजीप्रभूंच्या समर्पणाने पावन झालेल्या या खिंडीला म्हणूनच पावनखिंड असं नाव पडलं. स्टार प्रवाहवरील जय भवानी जय शिवाजी Jai Bhavani Jai Shivaji या मालिकेतून इतिहासातला हा महत्त्वाचा अध्याय पुन्हा जिवंत होणार आहे. हा ऐतिहासिक प्रसंग पुन्हा जिवंत करण्यासाठी मालिकेची संपूर्ण टीम सज्ज झाली आहे.

मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता भूषण प्रधान याविषयी म्हणाला, "पावनखिंड इतक्यात नको, पुढे ढकललं तर बरे… गेले अनेक आठवडे असेच वाटत होते. पण अखेर तो दिवस आला. आमचे बाजी जाणार! प्रोमोशूटचा दिवस मला आठवतोय. नुकताच तापातून उठून प्रोमोशूटला गेलो होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांचा प्रोमोशूट होता. त्यादिवशी अजिंक्य देव यांना भेटलो. आमची पहिलीच भेट होती. संभाषणाला सुरूवात झाली तीच जणू अनेक वर्षांपासूनची ओळख असल्यासारखी. सर, अजिंक्यजी असे कोणतेही पर्याय न देता भेटताक्षणी तो अजिंक्य दादा झाला. प्रोमो शूट संपले आणि न बोलताच एकमेकांना सांगून गेलो की एकमेकांना सांभाळत, एकमेकांवर विश्वास ठेवत आपला हा प्रवास सुखकर होणार. अजिंक्य दादा सेटवर आला की एक वेगळीच ऊर्जा सेटवर असायची. दादा एक उत्तम श्रोता, शांत आणि खरा स्वभाव, हसतमुख आणि अतिशय ग्राउंडेड आहे. आयुष्यात अनेक संकटांना सामोरा गेला असणार तरी चेहरा हसतमुख, कसलाच माज किंवा गर्व नाही आणि अनुभवी असूनही प्रचंड मेहनती. पाच महिन्यांचा त्याचा हा मलिकेतील प्रवास मला खूप काही शिकवून गेला आणि मी एक मित्र, एक मोठा भाऊ कमावला. पाच महिन्यांनंतर अजिंक्य दादाचा मालिकेतील प्रवास संपणार या विचाराने हळवा होत असताना, एक विचार मनात सारखा येतोय. घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांना गमावल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना काय वाटलं असेल? छत्रपती शिवाजी महाराजांनी, स्वराज्य स्थापनेचा प्रवास चालू ठेवला असावा ते दुःख गिळून, पण ओलावा जपून!"

बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणारे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी हा ऐतिहासिक प्रसंग शूट करण्याचा अनुभव सांगितला. "ज्याच्यासाठी सारा केला होता अट्टाहास असाच काहीसा हा प्रसंग आहे. हा सीन शूट करणं आव्हानात्मक होतं. हा प्रसंग अंगावर शहारा आणणारा आहे. सीन शूट करताना इतकी स्फूर्ती आहे की थोडाही क्षीण जाणवत नाही. आमचे कलादिग्दर्शक अजित दांडेकर यांनी पावनखिंडीचा अतिशय हुबेहूब असा सेट उभारला आहे. प्रेक्षकांना हा खास भाग नक्कीच आवडेल याची खात्री आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जीवदान मिळालं, तरी गणित फसलं! विक्रमांचा पाऊस पाडणारा Virat Kohli कसा बाद झाला पाहा... Video Viral

Woman Mountaineer : पुण्यातील महिला गिर्यारोहकांनी ‘माऊंट मेंटोक कांग्री-२’ शिखरावर फडकवला तिरंगा

Latest Marathi News Live Update : केतन अन् सियाच्या साखरपुड्याचा व्हिडिओ अखेर समोर

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता ऑनलाईनऐवजी ऑफलाईन, आयोगाचा मोठा निर्णय, मुख्य परीक्षेच्या तारखेतही बदल...

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

SCROLL FOR NEXT