Jay Bhim Movie Team eSakal
मनोरंजन

'जय भीम' चित्रपटावरच्या वादावर प्रकाश राज म्हणाले, धर्मांधांच्या...

जय भीम चित्रपटातील एका दृष्यावरून प्रकाश राज यांच्यावर टीका होतेय.

सुधीर काकडे

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जय भीम' या चित्रपटातील एका दृश्यामुळे एक नवा वाद उभा राहिला आहे. या चित्रपटातील एक पात्र दुसऱ्या पात्राला हिंदीत बोलल्याबद्दल कानशिलात लगावताना दिसतंय. कानशिलात लगावणारं हे पात्र प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज यांनी साकारलंय. चित्रपटातील या दृष्यामुळे एक नवा वाद सुरू झाला आहे. त्यामुळे प्रकाश राज वादात सापडल्याचं दिसतंय. हे दृश्य हिंदी भाषिक लोकांच्या विरोधात असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. त्यातच आता प्रकाश राज यांनी आपली बाजू मांडली आहे.

प्रकाश राज यांनी चित्रपटातील त्या दृष्यावरून सूरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, "ज्या लोक 'जय भीम'मधील दृश्यावरून टीका करताय, त्यांनी स्वत: आपला अजेंडा उघड केला." एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश राज म्हणाले की, "जय भीम सारखा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना आदिवासींच्या व्यथा दिसल्या नाहीत, त्यांना अन्यायाची भीती दिसली नाही. त्यांना फक्त ती एक थप्पड दिसली. एवढंच त्यांना समजलं. त्यामुळे त्यांचा अजेंडा स्पष्ट होतो."

ज्या दृष्यावरून हा वाद उभा राहिला, त्यावर बोलताना ते पुढे म्हणाले, "उदाहरणार्थ, दक्षिण भारतीयांना त्यांच्यावर हिंदी लादल्यागेल्याबद्दल राग आहे. जेव्हा एखादा स्थानिक भाषा माहित असणारा व्यक्ती पोलीस अधिकाऱ्याच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मुद्दाम हिंदी भाषा निवडत असेल, तर त्याच्या प्रतिक्रिया काय असतील? हा चित्रपट १९९० च्या दशकातील घटनेवर आधारित आहे. जर त्या पात्राने त्यांच्यावर हिंदी लादली असती, तर त्यानेही अशीच प्रतिक्रिया दिली असती. कदाचित ते अधिक तीव्रतेने समोर आले असते. हे लोक फक्त प्रकाश राज आहे म्हणून चिडले आहेत. अशा धर्मांधांच्या टीकेवर प्रतिक्रीया देण्यात अर्थ नाही." असे इंडिया टुडेच्या वृत्तामधून समोर आले आहे.

दरम्यान, दिग्दर्शक था से ज्ञानवेलचा जय भीम हा चित्रपट ९० च्या दशकात घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात इरुलर जमातीच्या लोकांवर पोलिसांकडून होणारा अत्याचार आणि जातीवरून होणारा भेदभाव यावर भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT