Jailer Rajinikanth Movie marathi Actor role esakal
मनोरंजन

Jailer Movie Marathi Actor : रजनीच्या जेलरमध्ये दोन 'मराठी' कलाकार, कोण आहेत ते?

नेल्सन दिलीपकुमार यांच्या जेलर नावाच्या चित्रपटामध्ये रजनीकांतनं दिलेला जो परफॉर्मन्स आहे तो कमाल आहे.

युगंधर ताजणे

Jailer Rajinikanth Movie marathi Actor role : रजनीकांतचा जेलर प्रदर्शित झाला आणि चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे. थलायवाच्या चित्रपटाचे त्याचे चाहते हे नेहमीच आतूरतेनं वाट पाहत असतात. गेल्या दोन वर्षांपासून चाहत्यांना जेलरची उत्सूकता होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

नेल्सन दिलीपकुमार यांच्या जेलर नावाच्या चित्रपटामध्ये रजनीकांतनं दिलेला जो परफॉर्मन्स आहे तो कमाल आहे. वयाची सत्तरी पार केल्यानंतरही आपण किती प्रभावीपणे काम करु शकतो आणि आपल्याला सुपरस्टार का म्हटले जाते हे रजनीकांतनं पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. जबरदस्त अॅक्शन सीन, हटके स्टाईल, लक्षवेधी संवादफेक यामुळे रजनीचा जेलर लक्षात राहतो.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत

जेलरमधील आणखी एक नवलाईची आणि मोठी गोष्ट म्हणजे त्यात दोन मराठी अभिनेत्यांनी काम केले आहे. त्याची सध्या चर्चा होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून साऊथच्या चित्रपटांमध्ये मराठी कलाकारांचा परफॉर्मन्स हा प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय आहे. शाहरुखच्या आगामी पठाण नावाच्या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओकची इंट्री कौतूकाचा विषय झाला होता.

आता त्या दोन प्रसिद्ध अभिनेत्यांनी रजनीकांतच्या जेलरमध्ये भूमिका करुन मराठी प्रेक्षकांची, चाहत्यांची वाहवा मिळवली आहे. ते दोन अभिनेते म्हणजे मकरंद देशपांडे आणि गिरीश कुलकर्णी हे आहेत. यापैकी गिरीश कुलकर्णी यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून त्यात त्यांनी रजनीसोबत इंट्री घेतली आहे. जेलमध्ये त्याच्यासोबत त्यांचे दिसणे हे बाकी चाहत्यांना कमालीचे आवडले आहे.

Jailer Movie

मकरंद देशपांडे यांनी एका गुंडाची भूमिका केली असून जेलमध्ये रजनी त्यांना धडा शिकवतो असे दाखवण्यात आले आहे. मात्र पुन्हा रजनी यांची मदत करण्यात मकरंद यांची भूमिका महत्वाची ठरते असे दिसून येते. सध्या सोशल मीडियावर या दोन्ही कलाकारांवर कौतूकाची वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Cricketer Death : भारताच्या क्रिकेटपटूचा मृत्यू! फलंदाजी करून परतत असताना जमिनीवर कोसळला, तडफडला अन्...; वाचा दुर्दैवी घटना

Nilanga News : आधार कार्डमधील विसंगतीचा विद्यार्थ्यांना फटका; निलंग्यात सात हजार ८३४ विद्यार्थी ‘अपार’ आयडीविना

ठरलं तर मग फेम अभिनेत्री गेली 17 वर्षं करतेय या आजाराचा सामना; "माझी ऐकू येण्याची क्षमता.."

BMC Budget : देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचे बजेट किती? कुठून येतो एवढा पैसा?

MAH-CET 2026 : बी.एड. आणि एलएल.बी. करिअरची दारे उघडली! सीईटी नोंदणी सुरू; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

SCROLL FOR NEXT