jailer rajinikanth movie twitter review fans likes jailer and movie climax SAKAL
मनोरंजन

Jailer Twitter Review: भारतीय सिनेमांच्या इतिहासातला सर्वोत्कष्ट Climax, रजनीकांतचा जेलर पाहून फॅन्सच जल्लोष

रजनीकांतचा जेलर सिनेमा पाहून फॅन्सनी ट्विटरवर काय प्रतिक्रिया दिल्यात जाणुन घ्या

Devendra Jadhav

Jailor Rajinikanth Twiitter Review: भारतीय सिनेमांचा सुपरस्टार अभिनेता म्हणजे रजनीकांत. रजनीकांतच्या जेलर हा नवीन सिनेमा आज रिलीज झालाय. रजनीकांतच्या जेलर सिनेमाची अनेक महिन्यांपासुन सर्वांना उत्सुकता होती. अखेर हा सिनेमा आज रिलीज झालाय.

रजनीकांतच्या जेलर सिनेमा पहाटेपासुनच थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दीत मिळवतोय. रजनीकांतचा जेलर पाहून फॅन्स ट्विटरवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. पहा काय म्हणाले थलायवाचे फॅन्स...

(jailer rajinikanth movie twitter review fans likes jailer and movie climax)

जेलरचे ट्विटर रिव्ह्यू

रजनीकांतचा जेलर पाहण्यासाठी चाहत्यांनी थिएटरबाहेर अगदी सकाळपासुनच रांगा लावल्या होत्या. अनेकांनी तर फटाके फोडले, दूधाने अभिषेक केला, थिएटरबाहेर ढोल-ताशांवर नाचले. चाहते आता ट्विटरवर 'जेलर'चे त्यांचे रिव्ह्यू शेअर करत आहेत.

एका चाहत्याने ट्विट केले, "भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वोत्तम क्लायमॅक्स." याशिवाय इतर अनेकांनी जेलरला 'ब्लॉकबस्टर' म्हटले.

अनेक फॅन्सनी जेलरच्या बॅकग्राऊंड म्युझिकचं, रजनीकांतच्या अभिनयाचं कौतुक केलंय. एकुणत सिनेमा एकदम मसाला एंटरटेनमेंट असुन जेलर सर्वांच्या पसंतील उतरलाय. CLIMAX चं अनेकांनी कौतुक केल्यामुळे नेमकं सिनेमाच्या शेवटी घडतं काय? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत

चेन्नई - बंगलोरमध्ये रजनीच्या फॅन्स जेलर पाहण्यासाठी सुट्टी

आज गुरुवार 10 ऑगस्ट रोजी रिलीज होणारा रजनीकांतचा 'जेलर' हा चित्रपट संपूर्ण भारतात बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग करेल अशी अपेक्षा आहे. रजनीकांत जवळपास 2 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. अशातच चेन्नई - बंगलोरमधील त्याच्या फॅन्सना आनंदाची बातमी मिळालीय.

चेन्नई आणि बंगलोरमधील अनेक कंपन्यांनी 10 ऑगस्ट रोजी कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर केली आहे. याआधी प्रोमो आणि ट्रेलरमुळे या चित्रपटाने आधीच चांगलीच हवा केली आहे. सुपरस्टार रजनीकांतचा 'जेलर' फिव्हर न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर पोहोचला आहे. 'जेलर'ला सर्वाधिक स्क्रीन्स मिळण्याची आशा आहे.

जेलरच्या रिलीजविषयी थोडंसं...

तुम्हाला माहिती आहे का, जेलर चित्रपटाचे पहिले नाव Thalaivar 169 असे होते. मात्र त्यानंतर मेकर्सनं हे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय रजनीकांत यांना ट्रीब्युट देताना घेतल्याची माहिती आहे.

रजनीकांत यांची ही १६९ फिल्म असून त्याची आता चाहत्यांना कमालीची उत्सूकता असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wakad Hinjewadi News : वाकड, हिंजवडीत अनधिकृत पार्किंगमुळे कोंडी; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; नागरिकांकडून कारवाईची मागणी!

Mutual Fund : काय आहे Active आणि Passive म्युच्युअल फंड? जाणून घ्या म्युच्युअल फंडमधील रिस्क आणि रिटर्न!

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : 26 तारखेच्या बैठकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट करू - नवनीत राणा

SCROLL FOR NEXT