Marathi Web Series Jakkal  esakal
मनोरंजन

Jakkal Web Serise : पुण्यातील जोशी-अभ्यंकर हत्याकांडावर 'जक्कल' वेबसीरिज

साधारण १९७० च्या काळात ज्या हत्याकांडानं पुणे हादरुन गेलं होतं. त्या जोशी अभ्यंकर प्रकरणावर आता मराठी मनोरंजन विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Marathi Web Series Jakkal : साधारण १९७० च्या काळात ज्या हत्याकांडानं पुणे हादरुन गेलं होतं. त्या जोशी अभ्यंकर प्रकरणावर आता मराठी मनोरंजन विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. या हत्याकांडावर वेबसीरिजची निर्मिती केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यातील या सीरियल मर्डर केसवर आधारित प्रकरणावर नेहमीच वेगवेगळ्या अँगलनं चर्चा होत असते.

जक्कल या नावानं मराठीतून वेबसीरिजची निर्मिती केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र या मालिकेसाठी आणखी काही थांबावे लागणार आहे. एका मध्यमवर्गीय कुटूंबातील चार मुलांनी जे निर्घृण कृत्य केले होती त्याची साऱ्या पुणे शहरानं धास्ती घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर २०२३ दरम्यान ही मालिका प्रसिद्ध होणार असून अद्याप त्यावर रिसर्च सुरु आहे. जिओ स्टुडिओ, शिवम यादव आणि ए कल्चर कॅनव्हास एंटरटेनमेंट प्रॉडक्शनच्यावतीनं या मालिकेची निर्मिती केली जाणार आहे.

Also Read - नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

गेल्या चार वर्षांपासून या मालिकेवर काम सुरु आहे. बॉलीवूडमध्ये यापूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपनं त्याच्या पॉच नावाच्या चित्रपटातून या घटनेवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नव्हता. तो चित्रपट त्यातील वादग्रस्त कंटेट मुळे प्रसिद्ध होऊ शकला नव्हता. त्यामध्ये के के मेनन, तेजस्विनी कोल्हापूरे, आदित्य श्रीवास्तव, विजय मौर्य, जॉय फर्नाडिस यांच्या भूमिका होत्या. जोशी अभ्यंकर खटल्यातील त्या दोषींना २७ नोव्हेंबर १९८३ मध्ये फाशी देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 39 लाख; या शेअरने दिला 3900% रिटर्न! अजूनही 80% वाढण्याचा ब्रोकरेजचा अंदाज

IPL 2026: सूर्याला धुरंधरची 'क्रेझ' Video Viral

Shaktipith Highway Sangli : शक्तिपीठ महामार्गातून सांगलीतील १९ गावे वगळली, नवीन मार्ग जयंत पाटलांची डोकेदुखी वाढवणार

Financial Risk Management : शेअर बाजार कोसळला तरी टेन्शन नाही! जोखीम व्यवस्थापनाचे 'हे' सोपे नियम प्रत्येक गुंतवणूकदाराला माहित हवेत

वयाच्या ५७ व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढला हा अभिनेता; पत्नीच्या इच्छेसाठी घातला सगळा घाट; लग्नाचे फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT