james cameron and ram charan  Sakal
मनोरंजन

'RRR मधील रामचरणचे पात्र अत्यंत आव्हानात्मक', अवतारच्या दिग्दर्शकानं केला कौतुकाचा वर्षाव... व्हिडिओ व्हायरल

पुन्हा एकदा RRR चित्रपटाच्या यशाचा उल्लेख हॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा आरआरआर जगभरात यशाचा झेंडा फडकावत आहे. या चित्रपटातील ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या दमदार भूमिकेने सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला आहे. आता पुन्हा एकदा RRR चित्रपटाच्या यशाचा उल्लेख हॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांनी केला आहे.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कॅमेरूनने RRR चित्रपटातील राम चरणच्या भूमिकेबद्दल सांगितले. ते म्हणाले की, जेव्हा तुम्हाला चित्रपटातील राम म्हणजेच अल्लुरी सीताराम राजूचे पात्र समजते तेव्हा तुमचे मन दुखावते. त्याचवेळी कॅमेरून यांनी पुन्हा एकदा एसएस राजामौली यांच्या भेटीचा उल्लेख केला.

जेम्स कॅमेरॉन या मुलाखतीत म्हणाले- "जेव्हा तुम्ही हा चित्रपट पाहत असता, तेव्हा जवळपास दोनवेळा चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला रामचे पात्र समजते. खूप दिवस हे पात्र समजून घेणं खूप आव्हानात्मक होतं आणि मग शेवटी त्याच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला समजतं आणि ही सगळी कथा खूप हृदयद्रावक आहे".

"मला वाटतं ही खूप मोठी उपलब्धी आहे. हे मी नुकतेच राजामौली यांना वैयक्तिकरित्या सांगितले होते, परंतु कार्यक्रमाला प्रचंड गर्दी असल्याने मी त्यांना जास्त वेळ भेटू शकलो नाही. मला त्याच्याशी अधिक बोलायला आवडेल".

याआधीही जेम्स कॅमेरून यांनी एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाचे कौतुक केले आहे. हा चित्रपट त्यांनी दोनदा पाहिला आहे. कॅमेरूनने पत्नीसोबत RRR हा चित्रपटही पाहिला आहे. त्यामुळे राजामौली खूप आनंदी आणि उत्साहित होते.

एसएस राजामौली यांचा चित्रपट आरआरआर जगभरात नाव कमवत आहे. RRR चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत गोल्डन ग्लोब 2023 जिंकला आहे. आता नाटु-नाटु हे गाणे ऑस्कर २०२३ च्या नामांकनापर्यंत पोहोचले आहे. नाटु-नाटुसोबतच रिहाना आणि लेडी गागा यांच्या गाण्यांचाही या वर्गात समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

शूटिंगदरम्यान ज्युनिअर एनटीआरला झालेली गंभीर दुखापत; खांद्यावर झाली शस्त्रक्रिया, आता 2 ते 3 महिन्यांचा घेणार ब्रेक

IND vs SL: शुभमन गिल-रिषभ पंत श्रीलंकेत धुमाकूळ घालणार? WTC मध्ये आजपर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम करण्याची संधी

Latest Marathi News Live Update : तुम्ही मला अस्पृश्यासारखी वागणूक देता, 'शुद्धीकरण' करता आणि माझा अपमान करता."- खर्गे राज्यसभेत संतापले

‘Gift a Life After Life’! अवयवदानासाठी ५०० विद्यार्थ्यांचा पुढाकार; ‘Tree Of Life’मधून दिला जीवनाचा संदेश

SCROLL FOR NEXT