Gunjan Saxena- The Kargil Girl First Look Poster 
मनोरंजन

जान्हवी कपूरच्या 'गुंजन सक्सेना'चे पहिले पोस्टर रिलीज!

वृत्तसंस्था

मुंबई : 'धडक' मधून बॉलिवूडमध्ये आपलं पदार्पण करणाऱ्या जान्हवी कपूरचा दुसरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे. स्टार किड्सची सध्या बॉलिवूडमध्ये स्थान मिळविण्यासाठी चांगलीच शर्यत पाहायला मिळतेय. जान्हवीही तिच्या पुढच्या चित्रपटातून चाहत्यांना भेटायला येत आहे. 'गुंजन सक्सेना : दि कारगिल गर्ल' हे तिच्या आगामी सिनेसाचं नाव असून नुकताच त्याचा पहिला पोस्टर रिलीज झाला आहे. नेटकऱ्यांमध्ये या पोस्टरची भरपूर चर्चा पाहायला मिळतेय. जान्हवीची या चित्रपटामधली भूमिका हटके असून तिचा पोस्टरमधला लूक सध्या चांगलाच वायरल होत आहे. 

या सिनेमामध्ये असणारा तिचा लूक जितका जबरदस्त आहे, तितकीच अनोखी या सिनेमाची कथा आहे. दिर्गदर्शक आणि निर्माता करण जोहरने ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती देत या चित्रपटाचा पहिला पोस्टर अपलोड केला आहे. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पोस्टरला दिलेल्या टॅगलाईन, "मुली पायलट होत नाहीत" आणि "भारतातील पहिली महिला वायुदल अधिकारी". काही दिवसांपूर्वी या सिनेसाच्या शूटिंगवेळी जान्हवीच्या लूकचे फोटो लिक झाले होते. त्यानंतर या चित्रपटाला घेऊन प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र, आता सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. 

पुढच्या वर्षी म्हणजेच 13 मार्च 2020 ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये वडिलांच्या भूमिकेतून पंकज त्रिपाठी दिसणार आहे. याशिवाय अंगद बेदी, विनीत कुमार, मानव विज ही मंडळी सिनेमात पाहायला मिळतील.

गुंजन सक्सेना या भारतीय वायुदलामध्ये फ्लाईट लेफ्टनंट होत्या. त्यांच्या जीवनावर आधारीत हा सिनेमा तयार करण्यात आला आहे. गुंजन सक्सेना यांना कारगिल गर्ल या नावानेही ओळखतात. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धाक्षेत्रामध्ये जाणाऱ्या त्या पहिल्या  महिला कॉम्बैट एविएटर होत्या. युद्धामध्य़े जखमी झालेल्या लोकांना वाचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. आपली जबाबदारी पार पाडत त्यांनी सर्वांपुढे आर्दश निर्माण केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meghalaya Minister Resignations: मेघालयमध्ये राजकीय हालचालींना वेग; 12 पैकी आठ मंत्र्यांचे राजीनामे; जाणून घ्या, नेमकं कारण?

मोदी सरकार हिंदू-मुस्लिम कार्ड खेळतंय... राहुल गांधी सकारात्मक विचाराचे! Shahid Afridi च्या विधानाचा BJP कडून समाचार

Latest Marathi News Updates : आयुष कोमकर हत्या प्रकरण : कृष्णा आंदेकर २ दिवस पोलीस कोठडीत

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये दोन स्पर्धकांनी घातला राडा; कायमचे झाले नॉमिनेट, काय घडलं नेमकं जाणून घ्या

Hingoli News : चार वर्षानंतरच्या मुहूर्ताला पालकमंत्र्यांचा खोडा; शिक्षक पुरस्काराचे वितरण पुढे ढकलले

SCROLL FOR NEXT