janhvi kapoor
janhvi kapoor Sakal
मनोरंजन

Janhvi Kapoor: जान्हवीने ज्युनियर एनटीआरसोबत 'एनटीआर 30' च्या शूटिंगला केली सुरुवात, फोटो आले समोर

सकाळ डिजिटल टीम

जान्हवी कपूरने नुकतेच साऊथ सिनेसृष्टीत पदार्पणाची बातमी जाहीर करून चाहत्यांना खूश केले. ती ज्युनियर एनटीआरसोबत 'एनटीआर ३०' या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्रीसोबतच तिचे चाहतेही या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत.

जान्हवी कपूरनेही 'NTR 30'चे शूटिंग सुरू केले आहे. होय, अभिनेत्रीने सेटवरील तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती हिरव्या रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये तिने क्लॅप बोर्डचा फोटो शेअर केला आहे.

जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून 'NTR 30'च्या शूटिंगदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिने लिहिले आहे, 'शुभ दिन, सर्वात चांगल्या प्रवासाची सुरुवात #NTR30.'

जान्हवी कपूरने काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील लूक शेअर केला होता आणि ती या चित्रपटाचा भाग होणार असल्याचीही माहिती दिली होती. ज्युनियर एनटीआरसोबत चित्रपटाच्या पडद्यावर काम करण्याचे जान्हवीचे स्वप्न होते, जे आता पूर्ण होणार आहे.

जान्हवी कपूरने एका मुलाखतीत सांगितले होते की, ज्युनियर एनटीआर हा तिचा आवडता हिरो आहे आणि ती त्याच्यासोबत काम करण्याची संधी कधीही सोडणार नाही. तेव्हापासून असा अंदाज लावला जात होता की जान्हवी लवकरच साऊथ चित्रपटात पाऊल ठेवणार आहे आणि अखेर ते होणार आहे.

जान्हवी कपूर शेवटची 2022 मध्ये 'मिली' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, 'NTR 30' व्यतिरिक्त ती 'बवाल' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही' मध्ये देखील दिसणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिकने जिंकला टॉस! मुंबईकडून 'या' खेळाडूचे पदार्पण, तर हैदराबाद संघातही मोठा बदल; पाहा प्लेइंग-11

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Disha Patani : दिशाच्या बिकिनी लुकचा सोशल मीडियावर धुमाकूळ; फोटो पाहून नेटकरी म्हणाले...

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT