janhvi kapoor birthday she reveals boney kapoors interesting condition for her prospective groom sakal
मनोरंजन

Janhvi Kapoor Birthday: जान्हवी लग्नाची झाली! नवराही हवाय, पण वडिलांनी घातलीय एक अट.. बघाच..

आज जान्हवीचा वाढदिवस, त्यानिमित्ताने jजाणून घेऊया बोनी कपूर यांना जावई कसा पाहिजे?..

नीलेश अडसूळ

Janhvi Kapoor Birthday : बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा आज वाढदिवस.. आज जान्हवी 26 वर्षांची झाली. अर्थात जान्हवी आता लग्नाला आली असं म्हणायला हरकत नाही.

सध्या जान्हवीची आई म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी नसल्याने तिची संपूर्ण जबाबदारी वडील बोनी कपूर यांच्यावर आहे. त्यामुळे अर्थात जान्हवीचं लग्न हा त्यांच्यासाठी एक महत्वाचा विषय असणार आहे.

तबोनी कपूर यांनी जान्हवीला मुलगा निवडण्याची मुभा दिली आहे खरी, पण जावई कसा हवा त्यासाठी एक अट त्यांनी घातली आहे, त्याविषयीच आज जाणून घेऊया..

बोनी कपूर यांना एका मुलाखतीत जावई कसा हवा असे विचारले गेले. त्यावर बोनी यांनी अत्यंत मजेशीर उत्तर दिले. त्यावर ते म्हणाले, 'तिला कोण हवा.. हे निवडण्याच तिला पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळे ती नक्कीच चांगला मुलगा निवडेल. आमची फक्त एक अट आहे, ती जान्हवी सांगेलच.'

त्यावर जान्हवी म्हणाली, 'वडिलांनी मुलगा निवडण्याची परवानगी दिली खरी पण अट मात्र घातली. ती म्हणजे जावई आपल्यासारखा उंच हवा. पपांना माझ्याबद्दल फारशी काळजी नाही. त्यांना माहिती आहे मी त्यांना निराश करणार नाही. त्यांचे फक्त एकच सांगणे आहे. माझ्यासारखा उंच जावई मला हवा. माझ्या वडिलांची उंची 6 फुट 1 इंच एवढी आहे.'


त्यामुळे आता मला एवढ्या उंचीचा मुलगा शोधायचा आहे, असंही जान्हवी म्हणाली होती. जान्हवी म्हणते, 'मला पप्पा नेहमी म्हणायचे, तू ज्या मुलाबरोबर लग्न करणार आहेस त्यापूर्वी आपण एकदा जगभ्रमंतीला जाऊ. मला आणि खुशीला ते या गोष्टी ते सांगत असतात. हे सगळं काही आमच्यासाठी खूप खास आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, लहानपणीच पितृछत्र हरपलं, आईने कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT