janhavi
janhavi 
मनोरंजन

जान्हवी कपूरने वयाच्या २३ व्या वर्षी मुंबईत खरेदी केलं एवढ्या कोटींच घर

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- अभिनेत्री जान्हवी कपूरने कमी वयात एक मोठी कामगिरी केली आहे. करिअर बनल्यानंतर घर बनवायला जिथे काही लोकांना वर्ष लागतात तिथे बोनी कपूर आणि दिवंगत श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरने बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर काही वर्षातंच स्वतःसाठी मुंबईत घर खरेदी केलं आहे. जान्हवीचं नवीन घर मुंबईतील जुहू भागात आहे. जे एका इमारतीत ३ मजल्यांचं आहे. 

अभिनेत्री जान्हवीने तसं पाहायला गेलं तर तर जेमतेम सिनेमे केलं मात्र तेही काही फार यशस्वी झाले नाहीत. मात्र तरीही तिने जे मुंबईत घर घेतलं आहे त्याची किंमत ऐकून तुमचे डोळे चक्रावतील. रिपोर्ट्सनुसार जान्हवीने या घराची किंमत ३९ कोटींमध्ये फायनल केली आहे. जान्हवीने ७ डिसेंबरला या घराची डिल फायनल केली होती. असं म्हटलं जात आहे की जान्हवीने या घरासाठी ७८ लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी देखील भरली आहे. सध्या जान्हवी बहीण खुशी आणि वडिल बोनी कपूर यांच्यासोबत लोखंडवालामध्ये राहतेय. 

श्रीदेवीच्या निधनानंतर जान्हवी मोठी मुलगी आणि बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या कारणाने प्रकाशझोतात आली. २०१८ मध्ये तिने धडक सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती शेवटची गुंजन सक्सेना द कारगिल गर्ल या सिनेमात दिसून आली होती. हा सिनेमा लॉकडाऊनमध्ये नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. जान्हवी केवळ २३ वर्षांची आहे आणि आत्ता कुठे तिच्या सिनेकारकिर्दिला सुरुवात झाली आहे. अशातंच तिने एवढी मोठी इंवेस्टमेंट करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

जान्हवी आगामी दोन सिनेमांमध्ये झळकणार आहे. यामध्ये 'दोस्ताना २' आणि 'रुही अफ्जाना' सारख्या सिनेमांचा समावेश आहे. जान्हवी सध्या न्यु इयर सेलिब्रेशन आणि वॅकेशन अभिनेता कार्तिक आर्यनसोबत एन्जॉय करताना दिसते. दोघांचे गोव्यामधील फोटो व्हायरल झाले आहेत.    

janhvi kapoor buys new house in juhu worth rs 39 crore  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

SCROLL FOR NEXT