Janhvi Kapoor Bollywood Actress Shikhar Pahadiya viral Janhvi Kapoor with Shikhar Pahariya Dance video:  esakal
मनोरंजन

Janhvi Kapoor: जान्हवी बॉयफ्रेंडसोबत गणेश विसर्जन मिरणुकीत भन्नाट नाचली! डान्स व्हिडिओ व्हायरल

Vaishali Patil

Janhvi Kapoor with Shikhar Pahariya Dance video: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. ती काही दिवसांपर्वी वरुण धवनसोबत बावल या चित्रपटात दिसली होती. Amazon Prime Video वर हा सिनेमा प्रदर्शित झाला.

ज्या प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता ती आदित्य कपुरसोबत चित्रपट करणार आहे. आता सध्या जान्हवीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात जान्हवी कपूर तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत जबरदस्त डान्स करतांना दिसत आहे.

अंबानी कुटुंबीयांच्या घराचा गणपती जास्त चर्चेत आणि आकर्षणाचा विषय असतो. बॉलिवूड स्टारपासून अनेक कलाकार यावेळी बाप्पाच्या दर्शनाला येतात. या अंबानी कुटुंबीयांच्या गणपती बाप्पाचे विसर्जनाची मिरवणुकही तितकिच जोरात झाली. यात अनेक बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले होते.

यातच जान्हवी कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ती रूमर्ड बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत डान्स करताना दिसत आहे. यावेळी जान्हवी कपूरच्या चेहऱ्यावर गुलाल लावलेला आहे. ती आनंदात नाचताना दिसत आहेत. तिच्या व्हिडिओनंतर नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचे नाव आत्तापर्यंत अनेक लोकांशी जोडले गेले आहे. यापुर्वी जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा होत्या. आता जान्हवी आणि शिखर यांच्या दोघांच्या नावाच्या चर्चा आहेत. ते अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. यापुर्वी ती तिरुपती मंदिरात पोहोचली होती.

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'मिस्टर अँड मिसेस माही'मध्ये राजकुमार रावही दिसणार आहे. जान्हवी कपूर आता ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा' चित्रपटातही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas Ceasefire Broken: ‘’गाझावर पूर्ण ताकदीने हल्ला करा...’’ ; नेतान्याहू यांनी लष्कराला दिले आदेश!

Prashant Kishor Notice : बिहार निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांना धक्का! ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जसलोक रुग्णालयात दाखल

Deglur News : मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांचे दुःखद निधन; धनगरवाडीत अंत्यसंस्कार

सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या? सौरभपासून वेगळं होण्यावर योगिता चव्हाणने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT