janhvi Kapoor Google
मनोरंजन

जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडची चर्चा; कोण आहे मिस्ट्री बॉय? जाणून घ्या

सोशल मीडियावर सध्या जान्हवी कपूरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे,त्यात अनोळखी मुलासोबत अभिनेत्री जवळीक साधताना दिसली.

प्रणाली मोरे

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी(Shridevi) यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर(Janhvi Kapoor) आज बॉलीवूड(Bollywood)मधलं चर्चेतलं नाव आहे. 'धडक' सिनेमातनं बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी जान्हवीनं आतापर्यंतच्या तिच्या फिल्मी करियरमध्ये अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या सिनेमांतून काम केलं आहे. अभिनयासोबतच जान्हवी सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती नेहमीच आपले हॉट अॅन्ड बोल्ड फोटो,व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिच्या फोटो-व्हिडीओवर तिचे चाहतेही खूप छान-छान प्रतिक्रिया नोंदवत असतात. पण आता जान्हवी कपूरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या व्हिडीओत जान्हवी एका अनोळखी मुलाचा हात मोठ्या प्रेमाने धरुन चालताना मीडियाला स्पॉट झाली. यावेळी ती एका ब्लॅक कलरच्या हॉट शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. तिच्या या लूकची देखील जोरदार चर्चा होत आहे. जान्हवीचा तो व्हायरल व्हिडीओ आम्ही इथे बातमीत जोडत आहोत.

जान्हवी कपूर अनेकदा मुंबई एअरपोर्ट,शॉपिंग,लंच,डिनरला जाताना मीडियाला स्पॉट होते. आणि अशा वेगवेगळ्या ठिकाणी मीडियानं काढलेले तिचे फोटो,व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. याचमध्ये आता एका मिस्ट्री बॉयसोबत तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत जान्हवी काळ्या रंगाच्या वनपीसमध्ये खूपच हॉट दिसत आहे. तिच्यासोबत जो मिस्ट्री बॉय आहे,त्यानं नियॉन रंगांचा सैलसर टीशर्ट घातलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आल्यानंतर खूपच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर जान्हवीच्या चाहत्यांनी थेट तिला त्या मिस्ट्री बॉयविषयी विचारलं आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना एका नेटकऱ्यानं विचारलं आहे की,'हा मुलगा कोण आहे?' तर आणखी एकानं विचारलं आहे की,'हा तुझा बॉयफ्रेंड आहे का?' तर आणखी एकानं तर सरळ म्हटलं आहे,'हातात हात पकडला आहे म्हणजे नक्की बॉयफ्रेंडच असणार'.

जान्हवी कपूरच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर ती वरुण धवनसोबत 'बवाल' सिनेमात दिसणार आहे, त्या व्यतिरिक्त 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही' मध्येही ती दिसणार आहे. आपले वडील निर्माते बोनी कपूर यांच्या 'बॉम्बे गर्ल' मध्येही जान्हवी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचसोबत 'गुड लक जेरी','तख्त' आणि 'दोस्ताना २' मध्ये देखील ती महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China-Pakistan Relation: सेकेंड स्ट्राइक क्षमतेच्या शोधात पाकिस्तान? चीनकडे अणु पाणबुड्यांची मागणी; मोठी रणनीती उघड

Mumbai Ahmedabad Highway Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकला कंटेनरची भीषण धडक; ३-४ ठार, २५ हून अधिक जखमी

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा सरकारवर दबाव वाढला! वेतन आयोगासमोर कर्मचाऱ्यांच्या ‘या’ मोठ्या मागण्या

नवरा कोट्यवधींचा मालक तरीही लोकप्रिय अभिनेत्रीवर आली शेण उचलायची वेळ? व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही इंधन तुटवडा, इंधनाअभावी अनेक पेट्रोल पंप बंद

SCROLL FOR NEXT