Janhvi Kapoor esakal
मनोरंजन

Janhvi Kapoor: 'तुझं नाही बापाच्या पैशांतून खरेदी केलंय घर!' जान्हवीला नेटकऱ्यांनी झाडलं

जान्हवीनं ६५ कोटींचं घर घेतलं, नेटकऱ्यांनी मात्र तिला शेलक्या प्रतिक्रिया देऊन जमिनीवर आणलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Janhvi Kapoor New Home: बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयापेक्षा बोल्डनेसनं चर्चेत असलेल्या जान्हवीला नेटकऱ्यांनी चांगलेच झापले आहे. जान्हवीनं नवीन घर घेतलं. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. जान्हवीच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला असून नेटकऱ्यांना मात्र ती गोष्ट आवडलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून जान्हवी सोशल मीडियावर भलतीच अॅक्टिव्ह झाली आहे.

जान्हवीची मिली नावाची फिल्म आज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा आहे. जान्हवी तर मिलीच्या प्रमोशनसाठी अनेकदा बोल्ड अंदाजात दिसत होती. काही दिवसांपूर्वी जान्हवीच्या वडीलांनी प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांनी तिच्यासोबत एक फोटो शेयर करुन आम्ही दोघे बहिण भाऊ दिसतो की नाही....अशी एक प्रतिक्रिया दिली होती. त्यावरुन ते दोघेही खूप ट्रोल झाले होते. आता जान्हवी तिच्या नव्या घरावरुन ट्रोल झाली आहे.

जान्हवी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. तिच्या फोटोंना मिळणारा प्रतिसादही मोठा असतो. बोल्ड लूकमध्ये तिनं शेयर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून तिला मिळणाऱ्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट असतात. जान्हवीनं आता मुंबईत बांद्रयामध्ये ६५ कोटींचे घर घेतले आहे. डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केलेल्या जान्हवीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मात्र नेटकऱ्यांनी लगेच तिला जमिनीवर आणलं आहे. नेटकऱ्यांनी आता जान्हवीच्या बँक बॅलन्सविषयी बोलण्यास सुरुवात केली आहे.

जान्हवीचे चित्रपट आणि त्याला मिळालेलं सक्सेस पाहिल्यास उलटं चित्र दिसून येईल. तिला मिळणाऱ्या चित्रपटांची संख्या मोठी आहे. मात्र ते बॉक्स ऑफिसवर आदळले आहेत. यासगळ्यात जान्हवीनं खरेदी केलेलं नवीन घर नेटकऱ्यांना तिच्यावर आगपाखड करण्यास पुरेसं आहे. त्यांनी तिला तुझ्या बापाचे पैसे आहेत. तुझ्या पैशानं घेतलेलं ते घर आहे का असा प्रश्न केला आहे. त्यामुळे जान्हवीचा काही वेळापूर्वीचा आनंद क्षणातच नेटकऱ्यांनी हिरावून घेतला आहे.

जान्हवीनं खरेदी केलेला फ्लॅट हा ६ हजार २४१ स्क्वेअर फुट एवढा असून तिनं तो बहिण खुशी आणि वडील बोनी कपूर यांच्या मदतीनं खरेदी केला आहे. रियल इस्टेट पोर्टलच्या एका डॉक्युमेंटनुसार १२ ऑक्टोबरला दस्तनोंदणी केल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: झाडाला बांधले, कपडे फाडले अन् बेदम मारहाण... भावासह प्रसिद्ध गायिकेसोबत अमानुष कृत्य, धक्कादायक कारण समोर

Satara Female Doctor : ती बीडची आहे म्हणून जर... धनंजय मुंडे साताऱ्यातील महिला डॉक्टर प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?

Local Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवार आणि रविवारी मेगाब्लॉक; कधी अन् कुठे? जाणून घ्या

PMC Election 2025 : PMC निवडणुकीचा सस्पेन्स कायम! आरक्षणाची सोडत कधी? आयोगाने नियमावली दिली, पण तारीख गुलदस्त्यातच

Dr Ajay Chandanwale : डॉ. अजय चंदनवाले यांची एमयुएचएसच्या कुलगुरूपदी नियुक्ती

SCROLL FOR NEXT