Janhvi Kapoor Reveals strange and shocking things about her Instagram
मनोरंजन

Janhvi Kapoor च्या चेहऱ्यावर होत्या मिश्या, म्हणाली,'ते दिवस माझ्यासाठी खूपच...'

जान्हवी कपूर सध्या तिच्या 'मिली' सिनेमामुळे भलतीच चर्चेत आहे. त्यात तिनं वैयक्तिक आयुष्याविषयी केलेले खुलासे हैराण करणारे आहेत.

प्रणाली मोरे

Janhvi Kapoor: बॉलीवूडमध्ये सध्या चर्चेत असलेल्या जान्हवी कपूरनं तिच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. तिनं आपल्या करिअरच्या पहिल्या शूटचा आणि त्यावेळच्या तिच्या लूकचा हैराण करणारा खुलासा केला आहे. जान्हवीला करिअरच्या सुरुवातीला खूप त्रास सहन करावा लागला,आणि तो देखील आपली आई श्रीदेवीमुळे. चला जाणून घेऊया काय आहे प्रकरण.(Janhvi Kapoor Reveals strange and shocking things about her)

लवकरच जान्हवी कपूरचा 'मिली' सिनेमा रिलीजच्या वाटेवर आहे. हा सिनेमा ४ नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे. याव्यतिरिक्त जान्हवी अनेक प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहे. नुकतेच मिली सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं दिलेल्या मुलाखतीत जान्हवीनं आपल्या करिअरच्या पहिल्या शूटचा हैराण करणारा अनुभव शेअर केला आहे. पण जान्हवी असं नेमंक काय म्हणाली?

जान्हवीनं सांगितलं की तिचं पहिलं शूट पीपल्स मॅग्झिनची कव्हर गर्ल म्हणून होतं आणि त्या दरम्यान तिची आई श्रीदेवी तिला वॅक्स करायची परवानगी देत नव्हती. ती म्हणाली,''तो काळ माझ्यासाठी खूप त्रासदायक होता, माझ्या चेहऱ्यावर अक्षरशः मिशा दिसतील एवढे केस होते,माझ्या हातांवरही खूप मोठे केस होते. पण माझी आई मला वॅक्सिंगची परवानगी द्यायची नाही. आणि त्यामुळे मला ते शूट वॅक्स न करताच करावं लागलं होतं''.

ज्या शूट संदर्भात जान्हवी बोलली आहे ते तिनं २०१२ मध्ये केलं होतं. ते तिच्या करिअरचं पहिलं शूट होतं. पीपल्स मॅगझिनची कवर गर्ल बनलेल्या जान्हवीच्या या शूटची इंडस्ट्रीत खूप चर्चा देखील झाली होती. पण जान्हवी यासंदर्भात बोलताना म्हणते की मला ते शूट माझ्या आयुष्यातील चांगल्या आठवणीत सामिल करता येणार नाही. तो माझ्या आयुष्यातील खूप मानसिक त्रासाचा काळ होता. खरंतर ग्लॅमर वर्ल्डमध्ये एन्ट्री करताना प्रत्येक अभिनेत्री आपल्या लूकला खूप चांगल्या पद्धतीनं मेंटेन करु पाहते पण स्वतः अभिनेत्री असूनही श्रीदेवी यांनी जान्हवीला तसं का करु दिलं नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे.

जान्हवी लवकरच 'मिली' या थ्रिलर सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा ४ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. या व्यतिरिक्त 'मि. अॅन्ड मिसेस माही' मध्ये ती राजकुमार राव सोबत दिसणार आहे. या व्यतिरिक्त जान्हवी वरुण धवनसोबतही एका सिनेमात काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

SCROLL FOR NEXT