Janhvi Kapoor sells off luxury Juhu apartment to his Co-star,famous Actor Google
मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्यानं खरेदी केलं जान्हवी कपूरचं घर, अभिनेत्रीनं कमावले करोडो

जान्हवी कपूरचं हे घर मुंबईतील जुहू विभागात एका आलिशान इमारतीत होतं.

प्रणाली मोरे

बॉलीवूड(Bollywood) स्टार्स आपल्या कमाईचा मोठा भाग एकतर घरात गुंतवतात किंवा इतर काही इन्वेस्टमेंटवर खर्च करतात. गेल्या काही दिवसांत तर अनेक सेलिब्रिटींनी प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार केलेले दिसून आले. आता राजकुमार रावने(Rajkumar rao) आपल्या प्रॉपर्टीत मोठी वाढ केली आहे अशी बातमी आहे. राजकुमार रावने आपल्यासाठी एक मोठं प्रशस्त घर खरेदी केलं आहे. पण यामध्ये इंट्रेस्टिंग गोष्ट ही आहे की त्यानं ते घर अभिनेत्री जान्हवी कपूर(Janhavi kapoor) कडून खरेदी केलं आहे.(Janhvi Kapoor sells off luxury Juhu apartment to his Co-star,famous Actor)

राजकुमार रावने मोठा ट्रिपलेक्स अपार्टमेंट जान्हवीकडून खरेदी केला आहे. त्यानं यासाठी जान्हवीला तब्बल ४४ करोड रुपये मोजले आहेत. हे अपार्टमेंट मुंबईतील जुहू विभागात आहे. जान्हवी आणि राजकुमार यांनी 'रुही' सिनेमात एकत्र काम केलं होतं. सिनेमात दोघांची उत्तम केमिस्ट्री दिसून आली होती. राजकुमार हे घर खरेदी करुन भलताच खूश आहे. तर जान्हवीला देखील हे घर विकून करोडोचा फायदा झाला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती द्यायची झाली तर, जान्हवी कपूरने स्वतः हे घर दोन वर्षांपू्र्वी खरेदी केलं होतं. २०२० मध्ये तिनं हे घर तब्बल ३९ करोड मोजून विकत घेतलं होतं. पण आता राजकुमार राव सोबत केलेल्या व्यवहारात तिला ५ करोडचा फायदा झाला आहे. हे घर ३४५६ स्क्वेअर फूटचे आहे. याची पर स्क्वेअर फूट किंमत सव्वा लाखाच्या आसपास आहे. तसं पाहिलं तर ही एक महागडी डील आहे.

बोललं जात आहे की या बिल्डिंगला बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माते आणि बिल्डर आनंद पंडित यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे बांधण्यात आलं आहे. या बिल्डिंगचे नाव लोटस आर्या असे आहे. रिपोर्टनुसार, राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखाने मिळून हे घर खरेदी केलं आहे. राजकुमार रावचं घर १४,१५,१६ व्या मजल्यावर ट्रिप्लेक्स रुपात आहे. या बिल्डिंगमध्ये बरेच सेलिब्रिटी राहतात. या नवीन डील आधी राजकुमार आणि पत्रलेखानं याच इमारतीत ११ आणि १२ व्या मजल्यावर ड्युप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

Pune News : भाजपने कंबर कसली! मोहोळ, बीडकर, लांडगे, कुल आणि जगताप यांच्याकडे दिली महत्वाची जबाबदारी

Farmer Fraud : ऊसतोड कराराच्या नावाखाली बार्शीच्या शेतकऱ्याची सहा लाख रुपयांची फसवणूक; मुकादमा विरोधात गुन्हा दाखल!

Pune Fraud : मांत्रिकाकडून दांपत्याची १४ कोटींची फसवणूक; इंग्लंडमधील घरासह सर्व संपत्ती विकण्यास भाग पाडले

Pali Public Protest : पाली नगरपंचायतच्या जुलमी करवाढीविरोधात संतप्त नागरिकांचा एल्गार; नगरसेवकांना जबाबदारीची जाणीव देणारे निवेदन!

SCROLL FOR NEXT