Janhvi Kapoor unfollows Sara Tendulkar? A love triangle brewing with Shikhar Pahariya? SAKAL
मनोरंजन

Janhvi Kapoor - Sara Tendulkar: बॉयफ्रेंडसोबत दिसताच जान्हवी कपूरने केलं साराला अनफॉलो! नेमकं काय झालं?

जान्हवी - सारा या दोन मैत्रीणींमध्ये बिनसलं असल्याची चर्चा आहे

Devendra Jadhav

Janhavi Kapoor - Sara Tendulkar News: सारा तेंडुलकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या लूकमुळे तर कधी शुभमन गिलमुळे ती चर्चेत असते. क्रिकेट वर्ल्डकप 2023 मध्ये सारा उपस्थित होती. त्यामुळेही तिची बरीच चर्चा झाली.

पण आता जी बातमी समोर येत आहे त्यामध्ये सारा चर्चेत आलीय ती जान्हवी कपूरमुळे. सारा - जान्हवीमध्ये बिनसलं असल्याची चर्चा आहे. काय झालंय नेमकं? आम्ही सांगतो.

अलीकडेच सारा तेंडूलकर जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत पार्टी करताना दिसली होती.

त्यानंतर बातमी येत आहे की, जान्हवी कपूरने सारा तेंडुलकरला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. त्यामुळे बी टाऊनमध्ये वेगळीच चर्चा सुरु झालीय.

शिखर-साराच्या पार्टीमुळे चर्चा

सध्या बॉलिवूडमध्ये जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया यांच्या नात्याची चर्चा आहे. जान्हवी कपूरने अलीकडेच 'कॉफी विथ करण'मध्ये शिखरसोबत रोमान्स केल्याच्या बातमीला दुजोरा दिला होता.

यादरम्यान जान्हवीने शिखरला शिखरू म्हटले होते, त्यानंतर त्यांच्या नात्यांवर आणखीनच शिक्कामोर्तब झाला. एकीकडे जान्हवीने शिखर सोबतच्या नात्याची पुष्टी केली आहे. तर दुसरीकडे शिखर सारा तेंडूलकरसोबत पार्टी करताना दिसला.

सारा - जान्हवीमध्ये बिनसलं?

सारा आणि शिखरला एकत्र पाहिल्यानंतर सर्वांच्या मनात विविध प्रश्न उपस्थित आहेत. जान्हवी अनेकदा शिखरसोबत कधी मंदिरांमध्ये तर कधी पार्टीमध्ये एकत्र दिसते. पण आता शिखर सारासोबत दिसल्याने चर्चांना उधाण आलंय.

आता शिखर - साराला एकत्र पाहिल्याने काही वेळानंतर जान्हवीने साराला इंन्स्टाग्रामवर फॉलो केलंय. आता हेच कारण आहे की अजून काही? याचा तर्क चाहते करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 3rd ODI: जैस्वालचं शतक अन् विराट-रोहितची फिफ्टी; भारताने दणदणीत विजयासह मालिकाही जिंकली

IND vs SA: यशस्वी जैस्वालने केलं संधीचं सोनं, वनडेत झळकावलं पहिलं वहिलं शतक; विराट, रोहितसारख्या दिग्गजांच्या यादीत स्थान

Latest Marathi News Live Update : मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील थोडक्यात बचावले

Mumbai News: दहिसर-भाईंदर प्रवास फक्त ५ मिनिटांत! ४५ मीटर रुंदीचा एलिव्हेटेड रोड उभारणार; बीएमसीची मोठी घोषणा

Nanded Cylinder Blast : शेतकामासाठी कुटुंब शेतात आणि घरात सिलेंडरचा स्फोट; सात लाखाचे नुकसान; तडखेल येथील घटना!

SCROLL FOR NEXT