Janhvi Kapoor with Boyfriend Shikhar Pahariya Esakal
मनोरंजन

Janhvi kapoor बॉयफ्रेंडला घेऊन पोहोचली तिरुपती मंदिरात..दाक्षिणात्य पेहरावात देवापुढं माथा टेकताना दिसलं कपल..

जान्हवी कपूर आणि शिखर पहाडियां यांच्या डेटिंगच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत.

प्रणाली मोरे

Janhvi Kapoor with Boyfriend Shikhar Pahariya: जान्हवी कपूर सध्या तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबतच्या बातम्यांमुळे भलतीच चर्चेत आली आहे. आज शिखरचा वाढदिवस असल्याकारणानं जान्हवीनं त्याच्यासोबत थेट गाठलं आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी मंदीर.

सोशल मीडियावर जान्हवी कपूरचा मंदिरात दर्शन घेतानाचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.(Janhvi Kapoor with Boyfriend Shikhar Pahariya at Tirupati Balaji Temple Video Viral)

जान्हवी कपूरनं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात शिखरला ती वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. तिनं फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती शिखर सोबत दिसत आहे. तसंच तिची बहिण खुशी कपूरनं देखील शिखर पहाडियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा: शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Janhavi Kapoor & Khushi Kapoor story Image

आपली छोटी बहिण खुशी कपूरसोबत जान्हवीनं अगदी साग्रसंगीत पूजा करत बालाजीचं दर्शन घेतलं. व्हिडीओमध्ये देवासमोर माथा टेकत..हात जोडून प्रार्थना करताना दिसली जान्हवी. तिनं सोशल मीडियावर फोटो शेअर करताच तो व्हायरल झाला आहे.

व्हायरल व्हिडीओत जान्हवी आणि खुशी दाक्षिणात्य पारंपरिक पेहराव केलेल्या दिसत आहेत. तर शिखर देखील धोती घालून दिसत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव केला आहे. जान्हवी कपूरसोबत मंदिरात तिच्या कुटुंबातील काहीजण देखील दिसत आहेत.

जान्हवी आणि शिखर यांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं गेलं. काही दिवसांपूर्वी शिखर एका इव्हेंट दरम्यान अभिनेत्रीच्या कुटुंबासोबत दिसला होता.

बोललं जात आहे की जान्हवी कपूर बॉलीवूडनंतर आता दाक्षिणात्य सिनेमात पदार्पण करते आहे. तिनं काही दिवसांपूर्वीच 'एनटीआर ३०' चं शूटिंग सुरू केलं आहे. या सिनेमात ज्युनिअर एनटीआर सोबत जान्हवी स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT