Janmashtami 2023 Esakal
मनोरंजन

Janmashtami 2023: "मग तुझे नको ते लाड पुरवण्याची बुद्धी...", जन्माष्टमीनिमित्त स्पृहा जोशीची पोस्ट व्हायरल

Vaishali Patil

Janmashtami 2023: आज देशभरात कृष्ण जन्माष्टमीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी दरवर्षी भाद्रपद कृष्ण अष्टमी तिथीला साजरी केली जाते. मान्यतेनुसार, या दिवशी भक्त श्रीकृष्णाची जयंती साजरी करतात आणि त्यांचे बाल स्वरूप साजरे करतात. कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र दहीहंडी उत्सव मोठ्या धाटात साजरा केला जातो. यात कलाकार मंडळींनीही पोस्ट शेयर करत चाहत्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अनेकांनी कृष्णाचे फोटो शेयर केले आहेत. त्यातच बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन, हेमा मालिनी यांनी देखील श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्यातच आता मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी हिने देखील कृष्णासाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेयर केली आहे.

स्पृहा जोशीनं एक कविता तिच्या सोशल मीडियावर शेयर केली आहे. यात ती म्हणते की,

दर गोकुळाष्टमीला तू बरोब्बर पाऊस घेऊन कसा येतोस ?

की पाऊस होऊन येतोस?

सगळं विज्ञान, भूगोल, लॉजिक आहेच

पण आजच्या दिवशी तुला त्यात बांधावसं नाही वाटत!

उगाचच आज तुझ्याशी भांडावंसं नाही वाटत!

तसंही बांधाल तितकं बंधन तोडून लांब जाण्याचंच खूळ तुला ..

मग तुझे नको ते लाड पुरवण्याची बुद्धी कशाला देतोयस आमच्या इंटेलेक्चुअल बुद्धीला?

त्यापेक्षा तुझं विश्वरूप दर्शन.. ते पेरलं असतंस आमच्या डोळ्यात...

तुझा सारासारविचार टोचला असतास आमच्या बुद्धीला...

आपल्या माणसांना काठावर ठेवण्याची शक्ती दिली असतीस..

किमान तुझी गूढ निळाईची एखाद रंगछटा दिली असतीस..

असो जिथे आहेस तिथे खुशाल अस!

इथली फार काळजी करू नको..

दर गोकुळाष्टमीला असा पाऊस पाठवत रहा फक्त

बाकी आमचं काही फार मनावर घेऊ नको..

- स्पृहा

स्पृहा जोशी ही मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. ती तिच्या उत्तम अभिनय कौशल्यासोबतच तिच्या कविता लेखन, सूत्रसंचालन यासाठी लोकप्रिय आहे. स्पृहा जोशीने नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज सर्वातच अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिच्या पोस्ट बऱ्याचदा व्हायरल होत असतात. आता तिची ही कविता देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नेटकरी तिचं कौतुक करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT