Japanese Singer Ryuchell Found Dead In Agent's Office at 27, Police Suspect Suicide SAKAL
मनोरंजन

Ryuchell Death: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल युशेलचं निधन, ऑफीसमध्ये सापडला मृतदेह

Ruychell Passed Away: जपानी मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री युशेलच्या निधनाची बातमी समोर येत आहे

Devendra Jadhav

Ryuchell Death News: जपानी मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री युशेलच्या निधनाची बातमी समोर येत आहे. अभिनेत्री युशेलचे वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी निधन झाले.

अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या टोकियो येथील ऑफीसमध्ये आढळून आला. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलीस त्याचा तपास करत आहेत.

(Japanese Singer Ryuchell Found Dead In Agent's Office at 27, Police Suspect Suicide)

Ryuchell ही जपानमधील एक प्रमुख LGBTQIA+ चेहरा होती. Ryuchell करत असलेली स्त्री - पुरुष भेदभाव नसलेली फॅशन जगभरात नावाजली जायची.

जपान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी संध्याकाळी टोकियोच्या शिबुया येथील एजन्सीमध्ये Ryuchell मृतावस्थेत आढळून आली.

Ryuchell जन्म 1995 मध्ये ओकिनावा प्रांतात झाला होता, त्यानंतर हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती टोकियोला आली. सुरुवातीला हारजुकू शहरातील अनेक कपड्यांच्या दुकानात ती काम करत होती. याशिवाय सोशल मिडीयावर प्रसिद्धी मिळवत होती.

Ryuchell ची घटस्फोटित पत्नी तेत्सुको ओकुहिरा, ज्याला पेको म्हणून ओळखले जाते. तिने मुलाचा पाचवा वाढदिवस मोठ्या केकसह साजरा केला. हा फोटो शेअर व्हायरल झाल्यानंतर काहीच तासांनी Ryuchell चे निधन झाले.

Ryuchell आणि तेत्सुको दोघे 18 वर्षांचे असताना भेटले, 2016 मध्ये त्यांनी लग्न केलं आणि दोन वर्षांनंतर त्यांना मुलगा झाला. तथापि, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, जेव्हा त्यांनी अधिकृतपणे घोषणा केली होती की ते घटस्फोट घेत आहेत.

याचं कारण Ryuchell ने उघड केले होते की, ते यापुढे पुरुष म्हणून ओळखले जात नाहीत, ज्यामुळे सोशल मिडीयीवर मोठा संताप निर्माण झाला होता.

या दोघांनी संयुक्त निवेदनात स्पष्ट केलंय की, ते वेगळे होत आहेत जेणेकरुन ते एक 'नवीन प्रकारचे कुटुंब' सुरू करू शकतील आणि त्यांच्या मुलांना एकत्र वाढवण्यास मदत करेल. आता Ryuchell चं निधन अकस्मात झालंय की तिने आत्महत्या केली आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT