Jasprit Bumrah, Aamir Khan
Jasprit Bumrah, Aamir Khan Esakal
मनोरंजन

Aamir Khan: क्रिकेटर बुमराहनं उडवली 'लाल सिंग चड्ढा'ची खिल्ली.. आमिर खानचं उत्तर ऐकून प्रत्येकजण होतोय हैराण

प्रणाली मोरे

Aamir Khan: बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा शेवटचा सिनेमा 'लाल सिंग चड्ढा' हा होता..तो रिलीज झाल्यानंतर अद्यापर्यंत तरी आमिरनं कोणता सिनेमा करायची हिम्मत केलेली नाही.सिनेमानं बॉक्सऑफिसवर काही खास कमाई केली नाही पण एक मात्र आहे लाल सिंग चड्ढा या भूमिकेसाठी आमिरनं घेतलेल्या मेहनतीची प्रशंसा मात्र जोरदार करण्यात आली.

आता आमिर पुन्हा एकदा पडद्यावर परत आलेला दिसला. पण यावेळी एका जाहिरातीच्या माध्यमातून. आणि त्याच्यासोबत क्रिकेटर जसप्रीत बुमराह देखील आहे .(Jasprit Bumrah mocks aamir khan laal singh chaddha box office collection in new advertisement)

आमिर आणि जसप्रीतची ही जाहिरात फेटेसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म Dreams 11 वर प्रक्षेपित करण्यात आली आहे. जाहिरात पाहून दोघांमधील केमिस्ट्री लोकांना भलतीच आवडलेली दिसत आहे. जाहिरातीत आमिर खानच्या लाल सिंग चड्ढाच्या बॉक्सऑफिसवरील कमाईची खिल्ली उडवली गेली आहे. एवढंच नाही तर आमिर देखील यावरनं मस्करी करताना दिसत आहे.

१५ सेकंदाच्या जाहिरातीत आमिर खान, क्रिकेटरला म्हणतो की,'' बूम बूम..बॉल सांभाळून टाक. मोठे मोठे हिट मारतो मी''. यावर बुमराह म्हणतो की, ''एवढे हिट्स मारता सर तुम्ही, मग लाल सिंगचं काय झालं?''

चाहत्यांची नजर जेव्हा यावेळी आमिरनं दिलेल्या रिअॅक्शनवर पडली तेव्हा सगळ्यांनी रिअॅक्शन द्यायला सुरुवात केली. अनेकांनी आमिरची प्रशंसा केली. ज्यापद्धतीनं अभिनेत्यानं आपल्याच सिनेमाच्या अपयशाची खिल्ली उडवली आणि सगळं खिलाडी वृत्तीनं घेतलं ते सगळ्यांनाच आवडलं.

एका चाहत्यानं बुमराहला टोमणा मारत म्हटलं,'यातलं एक मजेदार सत्य,जसप्रीत बुमराह आणि आमिर खाननं भारतासाठी गेल्या सात महिन्यात एकसारख्याच मॅचेस खेळल्यात'. आणखी एका चाहत्यानं लिहिलं आहे की,'आमिर सर ,तो फिल्डवर नाही दिसणार'.

माहितीसाठी सांगतो की आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' सिनेमाचं दिग्दर्शन अद्वैत चंदननं केलं होतं. हॉलीवूडच्या 'फॉरेस्ट गंप' सिनेमाचा हा सिनेमा अधिकृत रीमेक होता. सिनेमाचं बजेट १८० करोड होतं. पण बजेट इतकं देखील सिनेमानं कमावलं नाही.

रिपोर्ट्सनुसार,सिनेमानं जगभरात १३० करोडची कमाई केली. आमिर खानचा अभिनय उत्तम होता पण लोकांनी त्याच्या पंजाबी उच्चारांची खिल्ली खूप उडवली होती. थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर सिनेमा ओटीटी वर देखील रिलीज केला गेला होता. सिनेमाला तेव्हा देखील संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT