Javed Akhtar esakal
मनोरंजन

Javed Akhtar : ... तेव्हा भारतातील मुस्लिम का बोलले नाहीत, कुठे गेले होते? जावेद अख्तर संतापले!

आता तर जावेद अख्तर यांनी भारतातील मुस्लिमांवर टीका केली आहे. त्यामुळे ते देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Javed Akhatar Bollywood celebrity Indian Muslim personal board : बॉलीवूडमधील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर हे त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांसाठी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहे. ते नेहमीच आपल्या परखड वक्तव्यामुळे अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. आता तर जावेद अख्तर यांनी भारतातील मुस्लिमांवर टीका केली आहे. त्यामुळे ते देखील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

गीतकार अख्तर यांनी तालिबानकडून जे ट्विट करण्यात आले त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांची ती पोस्ट देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी काही प्रसिद्ध सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अख्तर यांचे म्हणणे आहे की, तालिबान्यांनी इस्लामच्या नावाखाली त्यांच्या देशातील महिलांचे शिक्षण बंद केले आहे. त्यांना नोकऱ्या देणे बंद केले आहे. हा सगळा काय प्रकार आहे....

Also Read - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

तालिबानी हे आता मुलींना, महिलांना शाळा, महाविद्यालयांमध्ये जाण्यास बंदी घालत आहे. त्यामागील त्यांचे कारणही अचाट आणि अजब आहे. त्याला काहीही अर्थ नाही. यासाऱ्या गोष्टींचा भारतातील मुस्लिम निषेध का करत नाही, त्यांना या गोष्टी माहिती नाही का, यावरुन त्यांना राग येत नाही का, असा प्रश्न जावेद अख्तर यांनी विचारला आहे. त्यामुळे ते देखील मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले आहेत.

फिल्ममेकर अशोक पंडित यांनी अख्तर यांच्या टिव्टला उत्तर दिले आहे. ते म्हणाले, जावेद साहेब त्यांनी आजपर्यत कधी तोंड उघडले नाही ते आता तरी कधी बोलणार आहे, काही दिवसांपूर्वी राजौरीमध्ये एका हिंदूची हत्या झाली होती. त्यावरुन मोठा गदारोळ झाला होता. त्यावेळी तुम्ही एक ट्विट करुन तुमची वेदना का व्यक्त केली नाही असा टोला अशोक पंडित यांनी अख्तर यांना लगावला आहे.

अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या तालिबान शासनानं २१ डिसेंबर रोजी असे जाहिर केले होते की, आता तालिबानी महिलांना कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेता येणार नाही आणि त्यांना नोकरीही मिळणार नाही. त्यांना शिक्षणासाठी बंदी घालण्यात आली होती. तालिबानचे उच्च शिक्षा मंत्री यांनी यामागील कारणही सांगितले होते. विश्वविद्यालयांमध्ये जे काही शिकवले जाते त्यामध्ये इस्लामचा द्वेष करण्यास सांगितले जाते. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

Pune Metro: आता रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित! वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटरचा पादचारी पूल; नागरिकांसाठी मोफत सुविधा

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Wedding Destination: शोधताय? हिमालयाच्या कुशीतलं हे मंदिर बनतंय नवविवाहितांचं आवडतं ठिकाण, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

SCROLL FOR NEXT