jawan actress nyanthara dismiss report being angry to and file defamation suit against baseless rumours of rift with atlee Esakal
मनोरंजन

Nyanthara On Atlee: मानहानीचा दावा ठोकणार? नयनतारा इतकी का संतापली?

जवान अभिनेत्री नयनतारा या चित्रपटाचे दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारवर नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या.

Vaishali Patil

शाहरुख खानचा चित्रपट 'जवान' या ब्लॉकबस्टर चित्रपटाने केवळ देशभरात नाही तर जगातही रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाची क्रेझ वाढलीय जवानने आत्तापर्यंत 526 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे, तर चित्रपट जागतिक बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा टप्पा लवकरच पार करणार आहे. मात्र सध्या शाहरुख खानपेक्षा चित्रपटातील अभिनेत्री नयनतारा जास्त चर्चेत आली आहे.

साउथ सिनेमाची लेडी सुपरस्टार म्हणुन ओळखली जाणाऱ्या नयनताराबाबत सोशल मीडियावर खुप साऱ्या बातम्या पसरत आहे. दिग्दर्शक अ‍ॅटली आणि तिच्यात मतभेद असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर ती पुन्हा बॉलिवूडमध्ये काम देखील करणार नाही. जवान चित्रपटात तिच्यापेक्षा जास्त दीपिकाला संधी दिली आणि तिचे सीन कट करण्यात आले त्यामुळे ती नाराज आहे.

अशा बातम्याही समोर आल्या आहेत. मात्र या सर्व अफवा आहेत. स्वत: नयनताराने याबद्दल माहिती दिली . नयनतारा तिच्या बद्दल पसरत असलेल्या अफवांना इतकी कंटाळली आहे की आता तिने कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे असा दावा केला जात आहे.

नयनतारानं 21 सप्टेंबर रोजी तिने अ‍ॅटलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सर्व पसरणाऱ्या अफवांना पूर्णविराम दिला.

आता, नयनताराच्या फॅन क्लबने असा दावा केला आहे की अभिनेत्री अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्या चॅनेल आणि पोर्टलवर कठोर कारवाई करण्याचा विचार करत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, नयनतारा खोट्या बातम्या पसरवणार्‍यांवर खूप संतापली आहे, तिच्या एका फॅन क्लबने केलेल्या दाव्यानुसार नयनतारा सोशल मीडियावर तिची बदनामी करणाऱ्या सर्वांवर कारवाई करणार आहे.

तर या व्हायरल ट्विटनंतर तिच्या चाहत्यांनी पाठिंबा दिला आहे. एकानं लिहिलयं. 'तू लवकरच कारवाई करशील अशी आशा आहे. तर दुसऱ्याने लिहिलंय की, "लेडी सुपरस्टार बॉलिवूडमध्ये पोहोचली आहे. तिच्याबद्दल नकारात्मकता पसरवू नका. यावर तिने नक्कीच कारवाई करायला हवी."

'जवान'मध्ये नयनतारा शाहरुख खानच्या प्रेयसी आणि पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती. जवान हा नयनताराचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असला तरी तिने याआधी अॅटलीसोबत 'बिगिल' या हिट चित्रपटात काम केले आहे. आता देखील तिच्याकडे बरेच प्रोजेक्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough Syrup Contamination : ...तर वाचला असता निष्पाप बालकांचा जीव; कफ सिरप कंपनीने केले ३५० बाबींचे उल्लंघन, अहवालात धक्कादायक माहिती समोर

Navid Mushrif Vs Shoumika Mahadik : गोकूळ दूध संघाकडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर गंडवा गंडवीची चलाखी, प्रकरण अंगलट येणार?

Flight Ticket Price Hike: प्रवाशांच्या खिशाला फटका! दिवाळीपूर्वी रस्तेसह हवाई वाहतूक सेवा महागली; काय आहेत दर?

ऑनलाइन गेममध्ये ५० लाख गेले, दागिने चोरताना पाहिल्यानं आईला लेकानेच संपवलं; स्क्रू ड्रायव्हरने गळ्यावर वार

Panic & Heart Attack Difference: हार्ट अटॅकची लक्षणे 'दिसतात' पॅनिक अटॅकसारखीच! डॉक्टरांनी सांगितली फरक ओळखण्याची सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT