jawan box office collection day 1 shah rukh khan nayanthara vijay sethupati atlee  SAKAL
मनोरंजन

Jawan Box Office: बापरे बाप! शाहरुखच्या जवानची पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई, १०० कोटींच्या वर कमाई

जवानने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफीसवर करोडोंचा गल्ला जमवलाय

Devendra Jadhav

Jawan Box Office Day 1 News: जवान सिनेमा काल बॉक्स ऑफीसवर रिलीज झालाय. जवान सिनेमाला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय. जवानने पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई केलीय.

शाहरुखच्या जवानने बॉक्स ऑफीसवर तुफान कमाई केलीय. जवानचा पहिल्या दिवसाचा बॉक्स ऑफीस रिपोर्ट समोर आलाय. हा रिपोर्ट पाहून जवानने पहिल्याच दिवशी १०० कोटींपेक्षा जास्त बिझनेस केलाय.

जवान ठरला बॉलिवूडमधील बिग ओपनर

शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट अखेर 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. अपेक्षेप्रमाणे, चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गल्ला जमवलाय. 'जवान'ने पहिल्या दिवशी इतिहास रचला म्हणून तो नक्कीच ब्लॉकबस्टर ठरला. बॉक्स ऑफीसवर रिपोर्टनुसार, SRK-स्टार जवानने भारतात तब्बल 75 कोटी रुपयांची कमाई केली. या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 150 कोटींहून अधिक कमाई केली. 'जवान' आता बॉलीवूडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर आहे.

जवानची एकूण कमाई

पहिल्या दिवशी 'जवान'ने भारतातील सर्व भाषांमध्ये 75 कोटी रुपयांची कमाई केली, असे बॉक्स ऑफीस रिपोर्टमधून समोर आलंय. गुरुवारी हिंदी आवृत्तीमध्ये चित्रपटाचा एकूण व्यवयाय सर्वाधिक आहे. तर आश्चर्य म्हणजे चेन्नईमध्ये ८१ % थिएटर भरले होते.

दरम्यान, बॉक्स ऑफीस विश्लेषक रमेश बाला यांनी X ट्वीटरवर नमूद केले की 'जवान'ने जगभरात 150 कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय. एकुणच शाहरुखच्या जवानने पठाणचा रेकॉर्ड मोडलाय. याशिवाय शाहरुखचा जवान बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरलाय

शाहरुखने फॅन्सचे मानले आभार

अॅक्शन थ्रिलर जवान रिलीज झाल्यानंतर काही तासांनंतर, शाहरुख खानने X ट्विटरवर जाऊन त्याच्या चाहत्यांसाठी आणि त्याला कायम पाठींबा दर्शवणाऱ्या फॅन्ससाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे.

शाहरुख म्हणतो, “प्रत्येक फॅन क्लबचे मला आभार मानण्यासाठी मला विशेष वेळ काढावा लागेल, कारण या फॅन्सनी चित्रपटगृहांमध्ये आणि बाहेरही आनंद साजरा केला. या सर्व प्रेमाने मी भारावुन गेलोय. पुढच्या एक - दोन दिवसात मला जरा निवांत वेळ मिळाला की तुम्हा सर्वांसाठी वेळ काढणार आहे. उफ!! #जवानवर प्रेम केल्याबद्दल माझं तुझ्यावर प्रेम आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : 26 तारखेच्या बैठकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट करू - नवनीत राणा

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT