Jawan Movie Advance Booking Shah Rukh Khan Film BEATS Advance Bookings Record Of Pathaan  SAKAL
मनोरंजन

Jawan: शाहरुखच्या जवानची पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कामगिरी, पठाणचा हा विक्रम मोडला

शाहरुखच्या जवानने या गोष्टीत पठाणला धोबीपछाड केलंय

Devendra Jadhav

Jawan first day first show news: शाहरुखच्या जवानची क्रेझ प्रचंड आहे. शाहरुखचा जवान आज ७ सप्टेंबरला सगळीकडे रिलीज झालाय. शाहरुखचे चाहते जवानची गेली अनेक वर्ष वाट पाहत होते. आज फायनली हा सिनेमा देशात नाही तर जगभरात रिलीज झालाय.

शाहरुखच्या जवानने रिलीजच्या काही दिवस आधी नवा विक्रम प्रस्थापित केलाय. रेकॉर्डब्रेक तिकीट विक्री होणारा जवान हा पहिला सिनेमा ठरलाय.

शाहरुखने स्वतःच्याच सिनेमाचा रेकॉर्ड मोडला

जवान चित्रपटाच्या प्री-रिलीज तिकीट विक्रीवर इंडस्ट्रीतील तज्ञ व्यक्ती बारकाईने लक्ष ठेवून आहेत. जवानची तिकीट विक्रीची संख्या अत्यंत आश्चर्यकारक आहे. संपूर्ण भारतातील उत्सुक चित्रपटप्रेमींनी पहिल्याच दिवशी तब्बल पाच लाखांहून जास्त तिकिटे काढली आहेत.

झूम डॉट कॉमनुसार जवानच्या हिंदी आवृत्तीसाठी 529,568, तमिळ आवृत्तीसाठी 19,899 आणि तेलुगू आवृत्तीसाठी बघण्यासाठी 16,230 मध्ये विभागली गेली आहे. विशेष गोष्ट म्हणजे, जवानने IMAX फॉरमॅटमध्ये 11,558 तिकीट विक्री करून लक्षणीय लक्ष वेधले आहे. इतकी जबरदस्त तिकीट विक्री बघता जवानने पठाणचा रेकॉर्ड मोडला आहे.

बॉसकॉट जवानची होतेय मागणी

किंग खान शाहरुख, मुलगी सुहाना खान आणि अभिनेत्री नयनतारा हे तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. अशावेळी काही नेटकऱ्यांनी शाहरुखला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तू आमच्या मंदिरात जातोस कसा, असा प्रश्नही शाहरुखला नेटकऱ्यांनी विचारला आहे. यावेळी हॅशटॅग #BoycottJawanMovie ट्रेंड होताना दिसत आहे.

जवानची तगडी स्टारकास्ट

'पठाण' नंतर 'जवान' हा शाहरुखचा दुसरा चित्रपट आहे. 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

शाहरुखच्या जवानमध्ये शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, नयनतारा, विजय सेतुपती आणि सुनील ग्रोव्हर देखील दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Squad: रोहित शर्माच्या सोबतीला सलामीसाठी दोन पर्याय! IPL 2026 Auction नंतर मुंबईचा संघ; तगडी Playing XI

IPL 2026 Auction : १९ वर्षीय आयुष, कार्तिक, २०चा प्रशांत वीर, २२ वर्षांचा ब्रेव्हिस; पण ४५ वर्षांचा MS Dhoni 'धुरंधर'; Memes व्हायरल

Achievers Of 2025: 'या' भारतीय कलाकारांनी बदलली मनोरंजनाची व्याख्या; त्यांच्या पॉवर परफॉर्मर्सवर एक नजर

Yavatmal News : बोगस मतदारांनंतर जन्म मृत्यूचीही बोगस नोंद? गावची लोकसंख्या दीड हजार, पण नोंदी २७ हजारापेक्षा जास्त; मुंबई कनेक्शन समोर...

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत लढविणार पन्नास जागा

SCROLL FOR NEXT