Jawan Movie SS Rajamouli Praises  esakal
मनोरंजन

Jawan Movie Rajamouli Post : '....म्हणून मी SRK ला 'बॉलीवूडचा बादशहा' म्हणतो!' साक्षात राजामौलींनीही किंग खानचं केलं कौतुक

सध्या किंग खान शाहरुखच्या जवान या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे.

युगंधर ताजणे

Jawan Movie SS Rajamouli Praises : भारताला ऑस्कर मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या एस एस राजामौली यांची गोष्टच वेगळी आहे. जगातील सर्वाधिक प्रभावशाली दिग्दर्शकांमध्ये आता त्यांचे नाव घेतले जात आहे. टायटॅनिक, अवतार या चित्रपटांचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांनी त्यांना आपल्या चित्रपटांमध्ये काम करण्याची ऑफर दिल्याचे समजते आहे.

सध्या किंग खान शाहरुखच्या जवान या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद देखील मिळाला आहे. किंग खाननं मोठा विक्रम करत चाहत्यांची मोठी पसंती मिळवली आहे. आतापर्यत सर्वाधिक ओपनिंग मिळवलेला चित्रपट म्हणून किंग खानच्या जवानचे नाव घेतले जात आहे. त्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Also Read - Dahi Handi - गुंतवणुकीची उतरंड कशी हवी याचा धडा देणारा उत्सव

एस एस राजामौली यांनी देखील एक्सवर खास पोस्ट शेयर करुन किंग खानचे कौतुक केले आहे. यापूर्वी प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख, कंगना रनौत, माधुरी दीक्षित यांनी शाहरुखची स्तुती केली होती. काही दाक्षिणात्य अभिनेत्यांनी शाहरुखच्या आगामी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. काही ट्रेड अॅनालिस्टनं देखील शाहरुखचा जवान हा पठाणचे रेकॉर्ड ब्रेक करणार असल्याचे भाकीत केले आहे.

राजामौली यांनी आपण शाहरुखला बॉक्स ऑफिसचा बादशहा का म्हणतात हे सांगितले आहे. छप्पर फाड कमाई कशाला म्हणतात हे शाहरुखच्या जवाननं दाखवून दिले आहे. शाहरुखच्या या चित्रपटासाठी मी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. त्याचबरोबर जवानच्या साऱ्या टीमचे देखील कौतुक करतो अशा शब्दांत राजामौलींनी किंग खानची प्रशंसा केली आहे.

राजामौली यांची ती पोस्ट व्हायरल होताच त्यावर किंग खाननं देखील त्याची दखल घेत राजामौली यांचे आभार मानले आहे. तुम्ही ज्या शब्दांत तुमच्या भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल धन्यवाद. आम्ही देखील बऱ्याचशा क्रिएटिव्ह आयडियाज या तुमच्याकडूनच शिकलो आहोत. असेही शाहरुखनं म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : 26 तारखेच्या बैठकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट करू - नवनीत राणा

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT