jawan Nashik malegaon News Shah Rukh Khan Fans Burst Firecrackers In Cinema Hall During Jawan  SAKAL
मनोरंजन

Jawan Malegaon: शाहरुखच्या फॅन्सचा धिंगाणा! मालेगावमध्ये थिएटरमध्ये फोडले रॉकेट आणि फटाके, व्हिडीओ व्हायरल

जवान सिनेमा पाहायला गेलेल्या फॅन्सनी थिएटरमध्ये एकच राडा केल्याची गोष्ट घडलीय

Devendra Jadhav

Jawan Movie News: शाहरुख खानच्या जवान सिनेमाने बॉक्स ऑफीसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. जवान पाहण्यासाठी शाहरुखचे फॅन्स अजूनही थिएटरमध्ये गर्दी करत आहेत.

शाहरुखचा जवान रिलीज होऊन एक महिना झालात तरीही जवानची क्रेझ कमी झाली नाही, याचा अनुभव नुकताच आलाय. नाशिकच्या मालेगावमध्ये जवान पाहायला गेलेल्या फॅन्सनी थिएटरमध्ये फटाके फोडल्याची घटना घडलीय. काय झालंय पाहा.

(jawan Nashik malegaon News Shah Rukh Khan Fans Burst Firecrackers In Cinema Hall)

जवान पाहायला गेलेल्या फॅन्सचा थिएटरमध्ये धिंगाणा

नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये शाहरुख खानच्या चाहत्यांनी सिनेमागृहात स्ट्रिंग बॉम्ब फोडला. शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचा शेवटचा शो काल मालेगावच्या कमलदीप थिएटरमध्ये पार पडला.

यावेळी शाहरुखच्या चाहत्यांनी सिनेमातच फटाके, सुतळी बॉम्ब फोडले. या घटनेनंतर सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. शाहरुख खानच्या चाहत्यांचा अतिउत्साह पाहून पोलिसांनी कारवाई केली आहे.

चालू शोमध्ये थिएटरमध्ये फॅन्सचा धिंगाणा

सार्वजनिक ठिकाणी आणि सिनेमा हॉलमध्ये ज्वलनशील पदार्थ आणि फटाक्यांवर बंदी असतानाही, थिएटरमध्ये शाहरुख खानचा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या काही प्रेक्षकांकडे स्ट्रिंग बॉम्ब आणि फटाके आढळून आले. त्याचा थेट सिनेमातही वापर केला.

चित्रपटगृहासमोर फटाक्यांच्या अचानक स्फोटामुळे मोठा आवाज झाला आणि चित्रपट पाहण्यात मग्न असलेल्या प्रेक्षकांमध्ये घबराट पसरली. या घटनेनंतर लगेचच चित्रपटाचा शेवटचा शो मध्यभागी थांबवण्यात आला.

जवानची कमाई सुसाट

पहिल्या आठवड्यात 'जवान'ची एकूण कमाई 389.88 कोटी रुपये होती, तर दुसऱ्या आठवड्यात 136.1 कोटींची कमाई केली होती. तिसऱ्या शुक्रवारी चित्रपटाने 7.6 कोटींची कमाई केली आहे. तर रिलिजच्या 21व्या दिवशी चित्रपटाने 5.15 करोडची कमाई केली आहे. यासोबत आत्तापर्यंत चित्रपटाने एकूण 614 कोटींचा टप्पा गाठला आहे.

अॅटली दिग्दर्शित जवानमध्ये प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पदुकोण, संजय दत्त, गिरिजा ओक, सान्या मल्होत्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या १२,००० पुरूषांच्या खात्यांची तपासणी सुरु - आदिती तटकरे

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT