jawan shah rukh khan famous dialogue writer sumit arora with director atlee  SAKAL
मनोरंजन

Jawan Dialogues: "पहले बाप से बात कर..!" डायलॉग लिहिणारा शाहरुखच्या जवानचा लेखक नक्की आहे तरी कोण?

शाहरुखच्या जवानचे डायलॉग सुद्धा प्रचंड गाजत आहेत. कोण आहे लेखक?

Devendra Jadhav

Jawan Release: शाहरुख खानचा जवान काल रिलीज झाला. जवानने पहिल्याच दिवशी भारतात जबरदस्त कामगिरी केली यात शंका नाही. जवान निमित्ताने शाहरुखच्या फॅन्सनी देशभरात अक्षरशः जल्लोष केला.

जवान सिनेमा पाहत असताना शाहरुखच्या जिंदा बंदा गाण्यावर प्रेक्षकांनी डान्स केल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. याशिवाय जवानमधले डायलॉग सुद्धा टाळ्या आणि शिट्ट्या वसुल करत आहेत. हे डायलॉग लिहिलेत सुमित अरोराने. जाणुन घेऊया त्याच्याविषयी..

(jawan shah rukh khan famous dialogue writer sumit arora with director atlee)

लेखक सुमित अरोराने नुकताच सोशल मीडियावर त्याचा नवीन प्रोजेक्ट “जवान” बद्दल चा उत्साह शेअर केला आहे. सुमितसाठी जवान हा त्याचा आयुष्यातील नक्कीच एक खास सिनेमा आहे असं तो म्हणतोय. याशिवाय सुमितने चित्रपटाला शुभेच्छाही दिल्या आहेत. जवाननिमित्ताने सुमितने चित्रपटाविषयी आणि लेखक म्हणून त्याच्या अनोख्या प्रवासाबद्दलची खास गोष्ट यातून शेयर केली आहे.

सुमित अरोराने "जवान" साठी संवाद लिहिले आहेत. त्याने त्याचा आजवरचा अनुभव आणि त्यांच्या असंख्य प्रोजेक्ट मधला वेगळेपणा जवानमध्ये संवाद लिहिताना वापरला आहे.

सुमित अरोराने ट्विटरवर ट्विट करून सांगितलं, "अवघ्या काही तासांत जवानवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. मी आजवर अनेक प्रोजेक्ट्सवर काम केलेय पण जवान हा खूप खास चित्रपट आहे. मला फक्त जवानसाठी संवाद लिहिण्यातच मजा आली नाही तर एक सर्जनशील व्यक्ती म्हणूनही मला खूप अफलातून प्रवास अनुभवयाला मिळाला. आजची रात्र एक खास रात्र होती कारण आम्ही एक टीम म्हणून एकत्र चित्रपट पाहिला. चीफ अॅटली यांचे खास आभार !

एकुणच सर्जनशील लेखक म्हणून जवान हा सुमितसाठी एक कमालीचा अनुभव असणार यात शंका नाही.

शाहरुखने फॅन्सचे मानले आभार

अॅक्शन थ्रिलर जवान रिलीज झाल्यानंतर काही तासांनंतर, शाहरुख खानने X ट्विटरवर जाऊन त्याच्या चाहत्यांसाठी आणि त्याला कायम पाठींबा दर्शवणाऱ्या फॅन्ससाठी एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे.

शाहरुख म्हणतो, “प्रत्येक फॅन क्लबचे मला आभार मानण्यासाठी मला विशेष वेळ काढावा लागेल, कारण या फॅन्सनी चित्रपटगृहांमध्ये आणि बाहेरही आनंद साजरा केला. या सर्व प्रेमाने मी भारावुन गेलोय. पुढच्या एक - दोन दिवसात मला जरा निवांत वेळ मिळाला की तुम्हा सर्वांसाठी वेळ काढणार आहे. उफ!! #जवानवर प्रेम केल्याबद्दल माझं तुझ्यावर प्रेम आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT