Jawan Shah Rukh Khan Movie Actress Riddhi Dogra interview esakal
मनोरंजन

Riddhi Dongra On Jawan : सेटवर एक गोष्ट शाहरुखनं स्पष्टपणे सांगितली होती, 'कुणीही...'!

गेल्या काही दिवसांपासून जवान हा चर्चेत आहे.त्याची सोशल मीडियावर मोठी क्रेझ आहे.

युगंधर ताजणे

Jawan Shah Rukh Khan Movie Actress Riddhi Dogra interview : शाहरुखच्या जवानचं यश हे त्याच्या अचूक निवडीला आहे असे बोलले जात आहे. त्याचे कारण म्हणजे त्यानं साऊथचा फॉर्मेट वापरल्यानं त्याला त्याचा मोठा फायदा होत असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून जवान हा चर्चेत आहे.त्याची सोशल मीडियावर मोठी क्रेझ आहे.

अॅटली दिग्दर्शित जवानमध्ये शाहरुख खान हा मुख्य भूमिकेत असून त्याच्या जोडीला नयनतारा, विजय सेतुपति, दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोंगरा, गिरीजा ओक, सुनील ग्रोव्हर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या कलाकारांच्या भूमिकांवर प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. जवानचे प्रमोशनही जोरदारपणे सुरु आहे. त्यात आता रिद्धी डोंगरानं दिलेल्या मुलाखतीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

सात सप्टेंबर रोजी शाहरुखचा जवान हा जगभर प्रदर्शित झाला. त्याला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले आहे. त्यानं आतापर्यत दोनशे कोटींपर्यत कमाई केली आहे. त्यावरुन हा चित्रपट आगामी काळात मोठी घोडदौड करणार असल्याचे बोलले जात आहे. पठाणचा रेकॉर्ड ब्रेक करणार असल्याची चर्चाही मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशातच रिद्धीच्या मुलाखतीनं किंग खानविषयी वेगळ्या प्रकारे बोलले जात आहे.

बॉलीवूडच्या किंग खान सोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता असा प्रश्न रिद्धीला विचारण्यात आला होता. त्यावेळी ती म्हणाली की, आम्हाला जेव्हा शाहरुखसोबत काम करायला मिळणार हे ऐकुनच आम्ही खूप उत्सुक होतो. त्याचा खूप आनंदही झाला होता. साक्षात किंग खानसोबत स्क्रीन शेयर करायला मिळणार याचा आनंद किती मोठा आहे हे शब्दांत सांगता येणार नाही.

रिद्धीनं जवानमध्ये शाहरुखच्या आईची भूमिका केली आहे. रियल लाईफममध्ये ती शाहरुखपेक्षा वीस वर्षांनी लहान आहे. रिद्धीनं म्हटलं आहे की, जवान ही ब्लॉकबस्टर होणार आहे. मला या चित्रपटामध्ये संधी दिल्याबद्दल मी शाहरुखची आभारी आहे. शाहरुख हा नेहमीच वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं स्विकारतो. त्याला न्याय देण्याचे काम करतो. हे कौतुकास्पद आहे.

जवानच्या सेटवर आम्हाला कडक सुचना होत्या. त्या म्हणजे आम्ही वेळेत सेटवर येणे. आपले रोल आणि सीन्स समजावून घेणे दुसरी महत्वाची बाब म्हणजे, सेटवर मोबाईल आणायला परवानगी नव्हती. कुणीही मोबाईल घेऊन येणार नाही. तसे दिल्यास त्यावर कडक कारवाई देखील होती. हे आम्हाला सुरुवातीलाच सांगण्यात आले होते. असे रिद्धीनं यावेळी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

Bigg Boss Marathi 6 Live Update: लीलाच्या एजेची राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

Bigg Boss Marathi 6 : घरची गरीबी, थॅलेसेमियाशी झुंज देणाऱ्या रीलस्टार डॉन प्रभू शेळकेची Entry !

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

SCROLL FOR NEXT