Jawan Shah Rukh Khan Movie Broke All Records  esakal
मनोरंजन

Jawan Preveu Record : शाहरुखचा नाद करायचा नाय! जवाननं रिलिजपुर्वीच केला नवा विक्रम

बॉलीवूडच्या किंग खानच्या जवानचा प्रीव्ह्यु काय प्रदर्शित झाला त्यानंतर चाहत्यांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

युगंधर ताजणे

Jawan Shah Rukh Khan Movie Broke All Records : बॉलीवूडच्या किंग खानच्या जवानचा प्रीव्ह्यु काय प्रदर्शित झाला त्यानंतर चाहत्यांचा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. वयाची साठ वर्षे ओलांडली तरी शाहरुख काय गोष्ट आहे हे त्यानं त्याच्या या नव्या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. काल सोशल मीडियावर जवान या चित्रपटाचा प्रीव्ह्यू रिलिज करण्यात आला होता.

शाहरुख, दीपिका पदूकोण, सान्या मल्होत्रा, गिरीजा ओक, विजय सेतूपती यासारख्या कलाकारांची फौज आपल्याला जवानमध्ये दिसणार आहे. अवघ्या काही वेळातच शाहरुखच्या त्या प्रीव्ह्यूला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचा वेगळाच विक्रम शाहरुखच्या नावावर झाल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी देखील शाहरुखच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर वेगवेगळे विक्रम आपल्या नावावर केले आहे.

Also Read - Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

यापूर्वी शाहरुखचा जेव्हा पठाण प्रदर्शित झाला होता. त्यावरुन मोठया वादाला सुरुवात झाली होती. त्यानंतरही या चित्रपटानं हजार कोटींची कमाई करुन वेगळा विक्रम आपल्या नावावर केला होता. सोशल मीडियावर आता शाहरुखच्या जवानच्या प्रीव्ह्यूनं जो विक्रम केला आहे त्याची चर्चा होताना दिसते आहे.

जवानाच्या प्री-रिलीज व्हिडिओने रिलीज होताच एक खळबळ उडवून दिली आहे. मागील 24 तासांत या चित्रपटानं अनेक भारतीय चित्रपट उद्योगातील टीझर्स आणि ट्रेलर्सद्वारे यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड मागे टाकले आहे. जवानने सर्व प्लॅटफॉर्मवर 112 मिलियन व्ह्युसह एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे. जवानचा प्रीव्यू पहिल्या 24 तासांत सर्वाधिक पाहिले गेलेले व्हिडिओ म्हणून अव्वल ठरला आहे.

जवान हे रेड चिलीज एंटरटेनमेंटची निर्मिती असून त्याचे दिग्दर्शन अॅटली, गौरी खान निर्मित आणि गौरव वर्मा सह-निर्माते आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT