Jawan Shah Rukh Khan Movie Pune Connection esakal
मनोरंजन

Jawan Pune Connection : काय सांगता 'जवान'ची शुटींग पुण्यात झाली? तो सीन तर पुण्यातल्या....

यापूर्वी याच वर्षी जानेवारीमध्ये शाहरुखचा पठाण नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानं हजार कोटींची कमाई केली होती.

युगंधर ताजणे

Jawan Shah Rukh Khan Movie Pune Connection : किंग खानचा जवान हा सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो आहे. या चित्रपटानं वेगवेगळए विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी याच वर्षी जानेवारीमध्ये शाहरुखचा पठाण नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानं हजार कोटींची कमाई केली होती.

जवाननं देखील पहिल्याच दिवशी भारतातून ७५ कोटींची कमाई केल्याचे आकडे समोर आले होते. यासगळ्यात जवानबाबत आणखी एक मोठी बाब समोर आली आहे. ती म्हणजे जवानचं शुटींग पुण्यात झाल्याचे. हे ऐकून कदाचित धक्का बसेल पण, जवानमधील तो खास सीन पुण्यात शुट झाल्याचे सांगण्यात येत आहे. तुम्ही जर जवान पाहिला असेल आणि त्यातला मेट्रो सीनवर तुमची नजर खिळली असेल तर मग तुमच्या लक्षात यायला वेळ लागणार नाही.

Also Read - हॅप्पी हार्मोन...

शाहरुखच्या जवानची शुटींग पुण्यात होणार याची माहिती बाहेर कुठे प्रसारित होणार नाही याची संबंधित काळजी यंत्रणेनं घेतली होती. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ती गोष्ट समोर आली आहे. ज्यात पुणे महामेट्रोनं एक्सवर एक खास पोस्ट करत त्याविषयी माहिती दिली आहे. जवानमधील तो मेट्रोमधील सीन पुण्यातील मेट्रोचा असल्याची बाब समोर आली आहे.

पुणे-पिंपरी चिंचवड मेट्रो प्रोजेक्टमधील संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनमध्ये जवानच्या काही दृष्यांचे चित्रिकरण करण्यात आले आहे. मेट्रोनं त्यांच्या अधिकृत एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याविषयी सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, हे शुटींग २०२१ मध्येच झाले आहे. त्याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आमच्याकरिता ही एक खरचं अभिमानाची बाब होती. असे त्या पोस्टमध्ये म्हटले गेले आहे.

जवानबाबत आणखी सांगायचे झाल्यास गुरुवारी (७ सप्टेंबर) रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. आतापर्यत या चित्रपटानं जगभरातून १४० कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे आकडे समोर आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT