Jawan Shah Ruk Khan Movie Relased CM Arvind Kejriwal  esakal
मनोरंजन

Jawan Movie : अरविंद केजरीवाल अन् 'जवान'चे काय आहे कनेक्शन? 'त्या' निर्णयाचा किंग खानला होणार मोठा फायदा?

अमेरिकेमध्ये जवानच्या अॅडव्हान्स बुकींगला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटानं प्रदर्शनापूर्वीच मोठी कमाई केली आहे.

युगंधर ताजणे

Jawan Shah Rukh Khan Movie Relased CM Arvind Kejriwal : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान हा त्याच्या आगामी जवान या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. त्याचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असा जवान चित्रपट पुढच्या महिन्यातील पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. त्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पठाणनं केलेल्या विक्रमी कमाईनंतर शाहरुखला त्याच्या जवान नावाच्या चित्रपटाकडून खूपच अपेक्षा आहेत.

जवान हा शाहरुखचा मेगा प्रोजेक्ट आहे. यापूर्वी किंग खानच्या पठाणननं हजार कोटींची कमाई करुन मोठा विक्रम केला होता. केवळ भारतच नाहीतर जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये त्यानं मोठी कमाई केली होती. आता चाहत्यांना जवानकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्याच्या यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ट्रेलर आणि गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. सध्या जवानच्या अॅडव्हान्स बूकींगची चर्चा जोरदार सुरु झाली आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

अमेरिकेमध्ये जवानच्या अॅडव्हान्स बुकींगला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटानं प्रदर्शनापूर्वीच मोठी कमाई केली आहे. यासगळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एका निर्णयावरुन चर्चेला सुरुवात झाली आहे. केजरीवाल यांनी जी २० समिटसाठी तीन दिवसांची सुट्टी जाहिर केली आहे. त्याची तारीख ८ ते १० सप्टेंबर अशी आहे. त्यामुळे दिल्लीतील प्रेक्षकांना किंग खानचा चित्रपट पाहण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

दिल्लीतील प्रेक्षक जी २० च्या या सुटीचा कसा लाभ घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यापूर्वी जेलर प्रदर्शित झाल्यानंतर तेथील तामिळनाडू सरकारनं खास तो चित्रपट पाहण्यासाठी सुटी जाहीर केली होती. त्या राज्यामध्ये रजनी यांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सुटी दिली जाते. रजनी यांचा फॅन बेस त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे.

सोशल मीडियावर जवानची खूपच चर्चा सुरु आहे. हा चित्रपट पठाणचाही रेकॉर्ड ब्रेक करेल असे बोलले जात आहे. त्यात शाहरुखची असणारी भूमिका प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतरही किंग खान हा नवोदित अभिनेत्यांसाठी प्रेरणादायी राहिला आहे. त्याची भूमिका प्रेक्षकांना कमालीची आवडली आहे. पठाणप्रमाणेच शाहरुख या चित्रपटातूनही प्रेक्षकांना मोठी ट्रीट देईल असे सांगितले जात आहे.

केजरीवाल यांनी जी २० समिटसाठी जाहिर केलेली सुट्टी ही एकप्रकारे जवानसाठी बुस्ट ठरु शकते असेही बोलले जात आहे. त्यामुळे त्याचा किंग खानच्या जवानला किती फायदा ठरु शकतो हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्कॉर्पिओला आग लागून एकाच कुटुंबातील चौघांचा अंत, मृतांमध्ये ZP सदस्यासह २ माजी सरपंचाचा समावेश

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगेंची पत्रकार परिषद! 30 मे पासून आमरण उपोषण

Badlapur Crime: बदलापुरात वडिलांच्या मित्रानेच १६ वर्षीय मुलीचा केला विनयभंग, मोबाईल चार्जिंगसाठी घरी आला अन्...

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Kolhapur Student Death Case : बाबा दुप्पट फायदा मिळणार आहेत, पैसे पाठवा..., मुलीचे शेवटचे शब्द, कुटुंबीयांनी नाकारलं विद्यार्थिनीने नको ते केलं

SCROLL FOR NEXT