Jawan Teaser: Shah Rukh Khan announces his FIRST collaboration with Atlee; To release on 2 June 2023 Google
मनोरंजन

Jawan Teaser Out: जखमी शाहरुख,चेहऱ्यावर पट्ट्या; खतरनाक आहे 'जवान'चा टीझर

'जवान' सिनेमा तामिळ,तेलगू,मल्याळम आणि कन्नड भाषेत पुढील वर्षी 2023 मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

प्रणाली मोरे

शाहरुख खानच्या(Shah Rukh Khan) चाहत्यांसाठी ३ जून हा दिवस एखाद्या सेलिब्रेशनपेक्षा काही कमी नाही. साउथ फिल्ममेकर एटली (Atlee)सोबत किंग खाननं हातमिळवणी करत मोठी घोषणा केली आहे. एटलीच्या 'जवान' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. या दिवसाची चाहते खूप दिवसांपासून प्रतिक्षा करीत होते.(Shah Rukh Khan Jawan Teaser Out)

'जवान' च्या टीझर मध्ये शाहरुख खानचा लूक पाहून सगळेच थोडे शॉक आहेत. 'जवान' बनलेला किंग खान खतरनाक लूक मध्ये दिसत आहे. नेहमीच प्रेमवीर किंवा रोमॅंटिक हिरोच्या इमेजनं लोकांची मनं जिंकणाऱ्या शाहरुखला याआधी क्वचितच आपण पाहिलं असेल. त्याच्या पूर्ण चेहरा,डोकं आणि हाता-पायावर पट्ट्या बांधलेल्या आहेत. हा टिझर पाहिल्यानंतर आपण प्रत्येकजण कदाचित बोलाल की शाहरुख 'जवान' च्या रुपात बॉक्सऑफिसवर नक्कीच धमाल करेल. 'जवान' एक अॅक्शन सिनेमा आहे. २ जून,२०२३ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याच वर्षात शाहरुखचा 'पठाण' देखील रिलीज होणार आहे. अर्थात २०२३ शाहरुख त्याच्या सिनेमांनी गाजवणार असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. 'जवान' सिनेमा तामिळ,तेलगू,मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित केला जाईल. टीझर पाहिल्यावर आपल्याला अंदाज येईलच की 'जवान' पॅन इंडिया सिनेमा आहे. याचा दिग्दर्शक आणि अभिनेत्री हे दोघेही साऊथचेच आहेत. 'जवान'च्या टीझर मध्ये शाहरुखचा अवतार पाहून आपण पुन्हा एकदा त्याचे फॅन बनाल यात शंका नाही. साऊथच्या अॅक्शन सिनेमासारखेच टिपिकल सीन शाहरुखला 'जवान' मध्ये करताना पाहून आपण नक्कीच wow म्हणाल.

मिळालेल्या वृत्तानुसार शाहरुख 'जवान' सिनेमात डबल रोल मध्ये दिसणार आहे. नयनतारा यात तपास अधिकारी म्हणून भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमात सान्या मल्होत्रा देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. बोललं जात आहे की सिनेमातील काही सीन वर शाहरुख फारसा खुश नव्हता. त्यानं दिग्दर्शक एटलीला स्क्रीन प्ले मध्ये थोडे बदल सूचित केले होते. एटली ने देखील त्या बदलांवर काम केलं. शाहरुखनं सुचवलेल्या बदलांवर एटली देखील खुश होता असं कळत आहे.

'जवान' व्यतिरिक्त शाहरुख खान 'पठाण' मध्ये दिसेल. हा सिनेमा पुढील वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे. पठाण मध्ये शाहरुखसोबत जॉन अब्राहम,दिपिका पदूकोण देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शाहरुख खान जवळ आणखी एक प्रोजेक्ट आहे ज्याचं नाव 'डंकी' आहे. राजकुमार हिरानी या सिनेमाचं दिग्दर्शन करीत असून तापसी पन्नू या सिनेमात शाहरुख सोबत पहिल्यांदाच काम करताना दिसणार आहे. शाहरुखचे एका पाठी एक तीन सिनेमे येतायत,जे बॉक्सऑफिसवर धमाका करतील अस बोललं जात आहे. आता सगळेच या सिनेमांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : दुकाने फोडणारा परराज्यातील सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT