jay dudhane bigg boss fame actor expensive bag stolen from car actor shared incident SAKAL
मनोरंजन

Jay Dudhane: बिग बॉस फेम अभिनेता जय दुधाणेच्या कारची काच फोडून झाली चोरी, धक्कादायक प्रकार उघडकीस

जयच्या गाडीची काच फुटल्याचं दिसतंय

Devendra Jadhav

Jay Dudhane News: ‘बिग बॉस मराठी ३’ चा उपविजेता जय दुधाणेची बॅग त्याच्या कारमधून चोरीला गेली. ही घटना सोमवारी (१० जुलै) रात्री घडली. चोरट्यांनी कारची काच फोडून त्याची बॅग चोरली.

जयने घडलेल्या घटनेची माहिती सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांना दिली आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीला फोटो शेअर केला होता. यात जयच्या गाडीची काच फुटल्याचं दिसतंय

(jay dudhane bigg boss fame actor expensive bag stolen from car actor shared incident)

जयने सोशल मिडीयाच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केलाय. यात त्याने कारची जी काच फुटलीय त्याची स्टोरी शेअर केलीय.

जयने त्याच्या चाहत्यांना सांगितले की तो सुरक्षित आहे, पण त्याची महागडी बॅग हरवली. जयने लिहिले, 'मित्रांनो, मी ठीक आहे, आणि माझी चौकशी केल्याबद्दल धन्यवाद.

कोणीतरी माझ्या गाडीची काच फोडली, आणि बॅग चोरी केली. तुम्ही तुमच्या गाड्या पार्क करता तेव्हा सावध रहा.' अशी पोस्ट जयने शेअर केलीय.

टाईम्स ऑफ इंडीयाच्या रिपोर्टनुसार, जयने आपली कार पार्किंग एरियात उभी केली होती, त्यानंतर तो कामासाठी निघून गेला. नेमकं त्याचवेळी चोरट्याने त्याच्या कारमधून बॅग चोरण्याची संधी साधली.

त्यामुळेच जयने त्याच्या चाहत्यांना त्यांच्या कार पार्क करताना सावधान राहण्याचे आवाहन केले. दरम्यान सेलिब्रिटींच्या कारमधून बॅग आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरीला जाण्याची ही पहिलीच वेळ नाही.

यापूर्वी, निया शर्मा आणि कौशांक अरोरा यांच्यासह अनेक हिंदी टीव्ही सेलिब्रिटींच्या कारमधून त्यांच्या बॅग चोरीला गेल्या होत्या आणि त्यांनी त्याविरोधात तक्रारही दाखल केली होती. त्यामुळे जयने त्याच्या फॅन्सना कार पार्कींगला असताना सावधानता बाळगळण्याचा इशारा दिलाय.

जय ‘बिग बॉस मराठी ३’ चा उपविजेता होता. याशिवाय तो लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमात झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Epstein files ओपन! सेक्स स्कँडलचे धक्कादायक 68 नवीन फोटो प्रसिद्ध... बिल गेट्ससह दिग्गज नेत्यांचे फोटो, जग हादरलं!

Ashes Test: ॲशेस कसोटीत ‘डीआरएस’वर शंका; ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व, कॅरीनंतर स्मिथच्या निर्णयावरही प्रश्‍नचिन्ह

Pimpri News : इंद्रायणी, पवना प्रदूषणमुक्तीसाठी आराखडा; सरपंच, उपसरपंच, अभियंते, अधिकाऱ्यांसमोर सादरीकरण

Viral Video: लेकीच्या जन्माचा जल्लोष! धुरंधरमधील 'FA9LA' गाण्यावर वडिलांचा भन्नाट डान्स, यामी गौतमने शेअर केली पोस्ट

Kolhapur City Crisis : २८० टन कचरा दररोज, पण प्रक्रिया अपुरीच; झूम प्रकल्पातील कचऱ्याचे डोंगर शहरासाठी धोक्याचे

SCROLL FOR NEXT