मनोरंजन

बलात्कारावर काँग्रेस आमदाराचं भयानक वक्तव्य: जया बच्चन भडकल्या

आपल्या परखड स्वभावासाठी आणि बोलण्यासाठी अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) ओळखल्या जातात.

युगंधर ताजणे

आपल्या परखड स्वभावासाठी आणि बोलण्यासाठी अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan) ओळखल्या जातात. यापूर्वी भाजपच्या (bjp) अनेक खासदारांना त्यांनी खडे बोल सुनावले आहेत. पंतप्रधान यांना देखील लाल टोपी प्रकरणावरुन त्यांनी धारेवर धरले होते. काहीही झालं तरी आपल्याला लाल टोपी घालण्यावाचून कोणी अडवू शकत नाही. असं विधान जया बच्चन यांनी केलं होतं. त्यानंतर आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्याचे कारण कॉ़ग्रेसच्या (congress) एका आमदारानं केलेल्या वक्तव्यानं त्या भडकल्या आहेत. आणि त्यांनी त्या आमदाराला ठणकावून उत्तर दिलं आहे.

बलात्कार यावर कॉग्रेसचे आमदार रमेश कुमार (ramesh kumar) यांनी लाजीरवाणी टिप्पणी केली होती. त्यावर त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका झाली होती. अनेकांनी त्यांच्या त्या बोलण्याचा तीव्र निषेध केला होता. हा मुद्दा तेव्हा चर्चेला आला जेव्हा संबंधित नेत्यानं शेतकरी आंदोलनावर बोलण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याकडे बोलण्यासाठी वेळ मागितला होता. मात्र कुमार यांच्या त्या बोलण्यामुळे समाजावादी पार्टीच्या खासदार जया बच्चन भडकल्याचे दिसून आले आहे. त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देत कुमार यांच्या बोलण्याचा निषेध केला आहे.

कुमार यांच्या वक्तव्यावर बच्चन (jaya bachchan) म्हणाल्या, कॉग्रेसचे आमदार कुमार यांनी केलेलं वक्तव्य अतिशय लाजीरवाणं आहे. साभागृहात अशाप्रकारचं वक्तव्य करणं हे अस्वस्थ करणारं आहे. मी त्याचा निषेध करते. अशा प्रकारची मानसिकता असणाऱ्या लोकांना सभागृहात बसण्याचा काहीच अधिकार नाही. सरकारनं तर अशा लोकांवर सक्त कारवाई करायला हवी. ते आमदार ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाच्या प्रमुखांनी त्यांच्यावर कडक कारवाई करणं गरजेचं आहे. पूर्वी अशी एक म्हण होती की, तुम्हाला बलात्कार थांबवता येत नसेल तर त्याचा आनंद घ्या...अशा प्रकारचं धक्कादायक आणि लाजीरवाणं वक्तव्य कुमार यांनी केलं होतं. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना अनेकांनी खडे बोल देखील सुनावले आहेत. कुमार यांनी या वक्तव्याच्या आधारे राजकीय निशाणा साधला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT