Jaya bachchan esakal
मनोरंजन

Jaya Bachchan: 'लाज कशी वाटत नाही सेल्फी घ्यायला'? जया बच्चन चाहत्यांवर संतापल्या

राज्यसभेत देखील त्यांच्या शीघ्रकोपीपणाचा अनुभव कित्येकांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याशी कुणी बोलायला आणि फोटो घेण्यासाठी तर कुणी जात नसल्याचे दिसून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Jaya Bachchan Angry on fans: बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन या त्यांच्या रागीट स्वभावामुळे अनेकांना माहिती आहे. राज्यसभेत देखील त्यांच्या शीघ्रकोपीपणाचा अनुभव कित्येकांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याशी कुणी बोलायला आणि फोटो घेण्यासाठी तर कुणी जात नसल्याचे दिसून आले आहे. जया बच्चन जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला जातात त्यावेळी चाहते त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. मात्र ही गोष्ट जया बच्चन यांना आवडत नाही. त्यावरुन त्यांच्या रागाचा पारा चढलेला दिसतो.

पापाराझ्झींना देखील त्यांनी अनेकदा रस्त्यात फोटो घेण्यावरुन फटकारल्याचे दिसून आले आहे. आताही असाच एक प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये जया बच्चन या अभिषेक बच्चनसोबत एका कार्यक्रमाच्या निमित्तानं भोपाळला गेल्या होत्या. त्याठिकाणी जे घडलं त्याची मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. यावेळी काही चाहत्यांनी जया बच्चन यांच्यासमवेत फोटो घेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले आहे. ही गोष्ट जया बच्चन यांना काही आवडली नाही.

जया बच्चन यांना पाहताच चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. आपल्याला त्यांच्याबरोबर एक फोटो मिळेल असे त्यांना वाटत होते. मात्र गर्दीमुळे चिडलेल्या जया बच्चन यांच्या रागाचा पारा चढला आणि थेट चाहत्यांनाच सुनावले आहे. तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. एक चाहता त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी पुढे आला. त्यावेळी जयाजींनी नाराजी व्यक्त केली. तुम्हाला सेल्फी घ्यायला लाज कशी वाटत नाही...या शब्दांत त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

दुसरीकडे अभिषेक बच्चन हा सगळ्यांशी आनंदात बोलत होता. चाहत्यांना फोटो काढून देत होता. त्याचवेळी चाहते जेव्हा जयाजींसोबत फोटो मिळावा म्हणून धडपडत होते तेव्हा जयाजी भडकल्याचे दिसून आले. तुमच्या त्या मोबाईलची लाईट डोळ्यात जाते, तुम्हाला काहीच कसे वाटत नाही, थोडीही लाज नाही का असे जयाजींनी चाहत्यांना सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT