Amitabh_Jaya_Bachchan
Amitabh_Jaya_Bachchan 
मनोरंजन

अमिताभ बच्चन यांच्यासाठी लिहली 'शहेनशहा'ची स्क्रिप्ट!

सकाळ डिजिटल टीम

Happy Birthday Jaya Bachchan : पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांचा आज ७३वा वाढदिवस. जया बच्चन यांनी जिथं पाऊल टाकलं तिथे यश मिळवलं. मग ते अभिनय असो, राजकारण असो किंवा अमिताभ बच्चन यांच्यासाठी स्क्रिप्ट लिहिणं असो. जया बच्चन यांनी त्यांच्या प्रत्येक जबाबदाऱ्या सहजपणे हाताळल्या.

चित्रपटसृष्टीत पदार्पण
जया बच्चन यांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. १९६३मध्ये त्यांनी सत्यजित रे यांच्या 'महानगर' या बंगाली चित्रपटात सहायक अभिनेत्रीची भूमिका साकारली होती.

वाईट काळात अमिताभ यांना पाठबळ
जया यांनी १९७१ मध्ये गुड्डी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी मिली, चुपके-चुपके, जंजीर यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. आणि अल्पावधीतच त्या हिट अभिनेत्री बनल्या. दुसरीकडे अमिताभ बच्चन हिट चित्रपटासाठी स्ट्रगल करत होते. १२ फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर अमिताभ यांनी बॉलिवूड सोडण्याचा विचार केला होता. त्यावेळी त्यांना जंजीरची ऑफर मिळाली, आणि मुख्य अभिनेत्री म्हणून जया बच्चन यांनाही घेण्यात आलं होतं. सगळेच चित्रपट फ्लॉप होऊ लागल्याने अमिताभ यांच्यासोबत कोणतीही अभिनेत्री काम करण्यास तयार नव्हती. 

घाईघाईत केलं लग्न
१९७३ मध्ये अमिताभ बच्चन आणि जया बच्चन 'जंजीर'मध्ये एकत्र दिसले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यावेळी दोघांमध्ये जवळीक वाढली. चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी दोघांनी परदेशात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन म्हणाले होते की, जर तुम्हाला जया सोबत सुट्टी घालवायची असेल, तर पहिल्यांदा तिच्याशी लग्न करावे लागेल. त्यानंतर ३ जून १९७३ रोजी अमिताभ आणि जया यांनी अतिशय साध्या पद्धतीने लग्न केले.

अमिताभ यांच्यासाठी लिहली शहेनशाहची स्क्रिप्ट
जया बच्चन या जेवढ्या चांगल्या अभिनेत्री आहेत, तशाच त्या चांगल्या स्क्रिप्ट रायटरही आहेत, हे बऱ्याच जणांना माहिती नाही. १९८८मध्ये रिलीज झालेल्या शहेनशाहची स्क्रिप्ट जया यांनी लिहली होती. शहेनशाह ही इंदर राज आनंद यांची मूळ कथा. पण प्रकृती बिघडल्याने इंदर राज हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. त्यानंतर काही दिवसातच त्यांचं निधन झालं. तेव्हा जया बच्चन यांनी सगळी स्क्रिप्ट लिहून काढली. दिग्दर्शक टिनू आनंद यांनीही जया बच्चन यांच्याच नावाचा उल्लेख केला. अमिताभ आणि मीनाक्षी शेषाद्री यांचा शहेनशाह बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला.

पद्मश्रीनं सन्मानित
जया बच्चन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणूनही ३ वेळा फिल्मफेअर मिळाला आहे. १९९२ मध्ये जया बच्चन यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर २००४मध्ये त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. सध्या जया बच्चन राज्यसभेत समाजवादी पक्षाच्या सदस्या आहेत.

- मनोरंजन क्षेत्रातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT