Jaya Bachchan esakal
मनोरंजन

Jaya Bachchan: 'एवढा राग येतो तर घरातून बाहेर पडू नका'? नेटकऱ्यांनी जयाजींना सुनावलं

दरवेळी चाहत्यांवर, नेटकऱ्यांवर आणि फोटोग्राफर्सला वाट्टेल तशा बोलणाऱ्या अभिनेत्री जया बच्चन यांना नेटकऱ्यांकडूनच ओरडा खावा लागला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Jaya Bachchan News: दरवेळी चाहत्यांवर, नेटकऱ्यांवर आणि फोटोग्राफर्सला वाट्टेल तशा बोलणाऱ्या अभिनेत्री जया बच्चन यांना नेटकऱ्यांकडूनच ओरडा खावा लागला आहे. आपल्या परखड वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या जया बच्चन यांची ओळख तापट स्वभावाची सेलिब्रेटी अशी आहे. चाहत्यांनी फोटो काढण्याची इच्छा व्यक्त करताच त्या त्यांच्यावर चिडल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी चाहत्यांना तुम्हाला लाज कशी वाटत नाही, असा प्रश्न विचारला होता. त्यावर आता नेटकऱ्यांनी जयाजींना सुनावले आहे.

भारतीय मनोरंजन विश्वातील मोठं नाव आणि राज्यसभेचे खासदार जया बच्चन या सोशल मीडियावरील प्रसिद्ध सेलिब्रेटी आहेत. ज्या त्यांच्या आक्रमकपणामुळे चर्चेत असतात. आपल्याला जे योग्य वाटेल ते तितक्याच परखडपणे मांडण्यात त्यांची भूमिका अग्रेसर असते. चित्रपटांतून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या जया बच्चन यांना आता नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तुम्हाला जर एवढा राग येतो तर मग तुम्ही घरातच का बसत नाही, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून जयाची या चाहत्यांवर चिडत असल्याचे दिसून आले आहे.

जयाजींनीच आपल्या तऱ्हेवाईक वागण्यातून नेटकऱ्यांना चर्चा करण्याची आयती संधी दिली आहे. त्याचं झालं असं की, जयाची या त्यांच्या नातीसोबत नव्या नवेली नंदाला घेऊन एका फॅशन वीकमध्ये गेल्या होत्या. तिथून बाहेर पडताना चाहत्यांनी त्यांना गराडा घातला. काहींना फोटो काढण्यास सुरुवात केली. यामुळे जयाची भडकल्या. त्यांचा तो अवतार पाहून नेटकऱ्यांनी जयाचींना सुनावले आहे.

जयाची तुम्हाला प्रत्येकवेळी नेटकरी, चाहते आणि पापाराझ्झींचा एवढा राग येत असेल तर मग तुम्ही घराच्या बाहेर कशाला पडता, तुमच्या प्रेमापोटी तुम्हाला पाहायला लोकं गर्दी करतात. मात्र तुम्ही खूपच रागावता. हे बरं नव्हे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT