Jaya Bachchan ingnore kangana ranaut. abhishek bachchan hug her,video viral Google
मनोरंजन

Jaya Bachchan यांनी सर्वांसमक्ष कंगनाकडं फिरवली पाठ, अभिषेकनं वेळीच प्रकरण सावरलं, व्हिडीओ व्हायरल...

'उंचाई' चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या वेळचा एक व्हिडीओ व्हायरल झाला अन लगोलग कंगना अन् सोबत जया बच्चन यांची चर्चा रंगली.

प्रणाली मोरे

Jaya Bachchan: पंगा क्वीन कंगना रणौत तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते.मग तो मुद्दा नेपोटिझमचा असो किंवा पाॅलिटिकल असो. पण आता पुन्हा कंगना रणौत वेगळ्याच मुद्दाला घेऊन चर्चेत आली आहे. 'उचांई' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावल्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Jaya Bachchan ingnore kangana ranaut. abhishek bachchan hug her,video viral)

बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन, बोमन इराणी, डॅनी डेन्झोंग्पा, परिणीती चोप्रा आणि नीना गुप्ता यांच्या 'उछाई' चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आले . ज्यामध्ये सिनेमात काम करुनही अमिताभ बच्चन उपस्थित राहिले नसले तरी बॉलीवूडमधील अनेक दिग्गज सेलेब्रिटी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे कंगना रणौत, अक्षय कुमार, सलमान खान, अभिषेक बच्चन, भाग्यश्री यांच्यासह सर्व सेलिब्रिटींनी 'उचांई' चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. ज्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडिओमध्ये कंगना रणौतही दिसली आहे.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कंगनाचे चाहते चांगलेच संतापले आहेत. या व्हिडिओमध्ये जया बच्चन कंगना रणौतकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. कंगना रणौतने जया बच्चन यांना शुभेच्छा दिल्यावर त्या कोणतीही प्रतिक्रिया न देता पुढे निघून गेल्या. व्हिडिओमध्ये अनुपम खेर जया बच्चनना कंगनाला भेटायला सांगतात पण तिथे त्या चक्क कंगनाकडे पाठ फिरवताना दिसल्या. पण त्या स्क्रीनिंगला उपस्थित राहिलेल्या अभिषेकनं मात्र जया बच्चन यांची गळाभेट घेत प्रकरण सावरलं. हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास आता सुरुवात केली.

व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्याने म्हटले की, "कंगनाला कोणाचीही गरज नाही", तर दुसऱ्या चाहत्याने म्हटले आहे की, "जया बच्चन कंगनाला घाबरत आहेत की काय?". अशा अनेक कमेंट्स 'उंचाई' च्या स्पेशल स्क्रिनिंगच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाल्या. "जया बच्चन एक असभ्य महिला आहे" असं देखील एका चाहत्याचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT