Jaya Bachchan spotted in rare good mood, poses for pics with paparazzi: 'Dekha kitna smile kar rahi hu'  sakal
मनोरंजन

Jaya Bachchan video: धक्काच! सतत चिडणाऱ्या जया बच्चन चक्क प्रेमाने वागल्या आणि पापराजी चक्रावले..

एरव्ही पापाराजींना ओरडणाऱ्या जया बच्चन आज वेगळ्याच मूडमध्ये दिसल्या..

नीलेश अडसूळ

Jaya Bachchan: बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री महानायक अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन या त्यांच्या रागीट स्वभावामुळे अनेकांना माहिती आहे. राज्यसभेत देखील त्यांच्या शीघ्रकोपीपणाचा अनुभव कित्येकांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याशी कुणी बोलायला आणि फोटो घेण्यासाठी तर कुणी जात नसल्याचे दिसून आले आहे.

जया बच्चन जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला जातात त्यावेळी चाहते त्यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. मात्र ही गोष्ट जया बच्चन यांना आवडत नाही. त्यावरुन कायमच त्यांच्या रागाचा पारा चढलेला दिसतो.

त्यामुळे पापाराजी आणि त्यांच्यात सतत खटके उडत असतात. बऱ्याचदा त्यांच्याकडून चुकीची वागणूक मिळाल्याने नेटकऱ्यांनीही जया बच्चन यांना ट्रॉल केले आहे. पणकाल मात्र असे काही झाले की जया बच्चन यांचा हा अवतार पाहून सारेच भारावून गेले.

(Jaya Bachchan spotted in rare good mood, poses for pics with paparazzi: 'Dekha kitna smile kar rahi hu')

जया बच्चन यांनी काल अबू जानी संदीप खोसला यांच्या पार्टीला हजेरी लावली होती. या सोहळ्यात अनेक दिग्गज सेलेब्रिटी उपस्थित राहिले होते. पण यावेळी एक अजब गोष्ट पाहायला मिळली.

एरव्ही पापाराजींना टाळून पुढे जाणाऱ्या जया यावेळी चक्क स्वतःहून त्यांना फोटो देत होत्या. स्वतःहून कलाकारांसोबत पोज देत होत्या. यावेळी सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यावर जयाजी म्हणाल्या, 'तुम्ही विचारून अशा चांगल्या पद्धतीने फोटो काढा ना, मी कधीच काही बोलणार नाही.. पण ं विचारता लपून छपून फोटो काढले तर मग मला राग येतो..'

एवढेच नाही तर त्यांनी चक्क मी कोणत्या फोटो ग्राफरला किती वर्षे झाले ओळखते हेही सांगितलं आणि एका फोटोग्राफर सोबत तर थेट फोटोच काढला. जया यांचे हे प्रेमळ वागणे सर्वांनाच चकित करून गेले आहे.

यावरही नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंटस दिल्या आहेत. 'आज हिला घरातून दम देऊन पाठवलं असेल की बाहेर जरा लोकांशी नीट वाग म्हणून..' तर एकजन म्हणतो, 'जयाजी आता सुधारल्या वाटतं..' तर काहींनी थेट त्यांना ''आई''ची उपमा देत त्यांचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Market Yard Traffic Advisory : बाबा आढाव यांच्या अंत्यदर्शनामुळे मार्केटयार्डात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तात्पुरते मार्ग बदल!

‘महाडीबीटी’वरील शेतकऱ्यांच्या अर्जांची पूर्वसंमती बंद! ट्रॅक्टरसह सगळ्याच यंत्रांची थांबली खरेदी; निधीची गरज ३१,८३२ कोटींची अन्‌ आहेत अवघे ११८९ कोटी रुपये

Baba Adhav refused Maharashtra Bhushan honour :...म्हणून बाबा आढाव यांनी नाकारला होता राज्याचा सर्वोच्च सन्मान, ‘महाराष्ट्र भूषण’!

अविश्रांत चळवळ! अखेरपर्यंत श्रमिकांसाठी लढत राहिले, सहा वर्षांपासून 'या' दुर्धर आजाराशी दिला लढा

Pune Airport Road Crash : मद्यधुंद चालकाची बेफाम गाडी; एअरपोर्ट रस्त्यावर तीन वाहनांचा अपघात; विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT