Jayant Savarkar Marathi Actor Passed Away age 88 esakal
मनोरंजन

Jayant Savarkar : प्रसिद्ध अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन

सावरकर यांच्या निधनाच्या बातमीनं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन क्षेत्रातील विविध सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे.

युगंधर ताजणे

Jayant Savarkar Marathi Actor Passed Away age 88 : मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले आहे. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं त्यांनी मराठी, हिंदी मनोरंजन विश्वावर वेगळी छाप उमटवली होती.

सावरकर यांच्या निधनाच्या बातमीनं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन क्षेत्रातील विविध सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी शंभरहून मराठी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या. ३० हून अधिक अधिक हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. जयंत सावरकर यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भुषविले होते.

वेगवेगळ्या भूमिकांसाठी जयंत सावरकर यांची ओळख होती. त्यांनी विनोदी, गंभीर भूमिकांमधून प्रेक्षकांना जिंकून घेतले होते. त्यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अभिनेता जयंत सावरकर मागील 15 दिवस रुग्णालयात होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. जयंत सावरकर यांच्या जाण्यानं मराठी मनोरंजन विश्वात निर्माण झालेली पोकळी ही भरुन न येणारी आहे.

जयंत सावरकर यांच्या लोकप्रिय भूमिकांविषयी सांगायचे झाल्यास ते काही महिन्यांपूर्वीच ते 'आई कुठे काय करते' मालिकेत दिसले होते. याबरोबरच 'समांतर' या वेब सीरिजमध्ये त्यांनी केलेली ज्योतिषाची भूमिकाही विशेष गाजली होती. सोशल मीडियावरुन जयंत सावरकर यांना चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी आदरांजली वाहिली आहे. यावेळी अनेक मराठी मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटींनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

जयंत सावरकर यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झाला.वयाच्या 20 व्या वर्षापासून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली होती. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे),अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष),अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), एकच प्याला (तळीराम) सारख्या मराठी नाटकात त्यांनी काम केलं. त्यांच्या या भूमिका मराठी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन राहिल्या. त्या वेगवेगळ्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतूक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yavat Violence: यवतमध्ये कलम १४४ लागू, परिस्थिती नियंत्रणात; अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचे आवाहन

Raksha Bandhan Astrology Alert: रक्षाबंधनच्या दिवशी शनि-मंगळ येणार आमने-सामने, या ३ राशींना बाळगावी लागणार सावधगिरी

Rajya Shetti : 'माधुरी' हत्तिणीसाठी पेटाच्या अधिकाऱ्यांनी २ कोटींची दिली होती ऑफर.....! राजू शेट्टींचा खळबळजनक आरोप

Latest Marathi News Updates Live: माजी नगरसेवक कमलेश राय यांना खंडणी प्रकरणात अटक

वाटोळं होई जाई तुजं वाटोळं... अमृता-अनिताच्या दमदार अभिनयाने सजलेला 'जारण' आता ओटीटीवर; कधी, कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT